जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लाँच

जगातील पहिला डय़ुअल स्क्रीनचा लॅपटॉप एसेमॅजिक एक्स वन लाँच करण्यात आला. या लॅपटॉपमध्ये 360 डिग्री हॉरिजॉन्टल फोल्ड फीचरसोबत डय़ुअल स्क्रीन दिली आहे. युजर्सला साईड बाय साईड डिस्प्लेचा एक्सपीरियन्स मिळेल. या लॅपटॉपमध्ये 14 इंचांचे दोन फूल एचडी स्क्रीन दिले आहेत. हा लॅपटॉप 16 जीबी डय़ुअल चॅनेल आणि 1 टीबी एसएसडी स्टोरेजसोबत येईल. या लॅपटॉपचे खास वैशिष्टय़ म्हणजे समोर बसलेली व्यक्ती आणि लॅपटॉप चालवणारी व्यक्ती, दोघेही स्क्रीन पाहू शकतील. या लॅपटॉपची किंमत अद्याप समोर आलेली नाही.