आजच्या धावपळीच्या युगात अनेक जण आपले जीवनशैली विसरुन काम करतात. मात्र, जीवन जगतांना शरीराची काळजी न घेतल्यास आजारांना निमंत्रण मिळते. यासाठी पुरेशी झोप, भरपूर पाणी प्या, योग्य आहार आणि नियमित व्यायामाने निरोगी आयुष्य जगा. तसेच आजाराचे लक्षण वाटल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर युरोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अभय महाजन यांनी यावेळी सांगितले.
मूत्रपिंडाचे जुने आजार, मूत्रपिंड निकामी होणे, मूत्रपिंड प्रत्यारोपणापासून ते यूरोलॉजिकल विकारांची सर्वसामान्यांपर्यंत माहितीच नसते, त्याही पुढे जाऊन या आजारांवर उपचार करणारी स्वतंत्र वैद्यकीय शाखा आहे याची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी करून देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. बरेचदा लोकांना हे माहित नसते की कोणत्या प्रकारचे रोग झाल्यास कोणत्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यामुळे त्यांना कधी कधी वेळेवर योग्य उपचार युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाने 13 ऑक्टोबर युरोलॉजी अवेअरनेस रोजी देशभरात युरोलॉजी डे निमित्त जागरूकता दिवस साजरा डॉक्टरांचे आवाहन निर्माण होते. युरोलॉजिस्ट करण्याचे ठरविले आहे अशी माहिती छत्रपती संभाजीनगर युरोलॉजी सोसायटी शाखेचे अध्यक्ष डॉ. अभय महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. जनसामान्यांना युरोलॉजीची माहिती देणे, मूत्रविज्ञानाशी संबंधित आजार असल्यास रुग्णांनी युरोलॉजिस्टकडून तपासणी करून घेणे त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे याची जाणीव मिळू शकत नाहीत व गुंतागुंत म्हणजेच युरोसर्जन हे स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलांचे मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय, एड्रिनल ग्रंथी, पुरुषाचे जननेंद्रिय (प्रोस्टेट, अंडकोष, लिंग) ह्यांच्या आजारांवर आवश्यक असल्यास ऑपरेशन करतात. या अवयवांमध्ये मूतखडा, संसर्ग, अडथळा, दोष, दुखापत, जन्मजात रोग, कर्करोग इत्यादी आजार झाल्यास उपचार आणि ऑपरेशनसाठी युरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर युरोलॉजी सोसायटीचे सचिव डॉ. प्रशांत दरख यांनी केले. पत्रकार परिषदेला डॉ. पुरुषोत्तम दरख, डॉ. शरद सोनी, डॉ. व्यंकट गीते, डॉ. देवदत्त पळणीटकर, डॉ. अतुल सोनी, डॉ. अल्ताफ शेख, डॉ. मयूर दळवी, डॉ. अझहर पटेल, डॉ. सुबोध पाटणकर, डॉ. कृष्णा किरकिरे यांची उपस्थति होती.
पाणी आणि जमीनीचा पोत तपासणे महत्वाचे
महाराष्ट्रात विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यातील काही जिल्हे मिळून पाणी आणि जमीनीचा पोत तपासणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. क्षारांचे प्रमाण काही भागात जास्त असल्याने त्या भागात किडनीसंदर्भात आजार वाढत आहे.