
दिल्लीतील एका अॅप डेव्हलपरने शिक्षणासाठी पैसे उभे करण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. या तरुणाने थेट जिओहॉटस्टार डोमेनची नोंदणी करून त्याची मालकी मिळवली आहे. जिओ सिनेमा आणि डिस्नी प्लस हॉटस्टारचे येत्या काही दिवसात विलीनीकरण पूर्ण होणार आहे. ही शक्यता लक्षात घेऊन या तरुणाने जिओहॉटस्टार डोमेनची नोंदणी आपल्या नावावर करून घेतली. या डेव्हलपरने नोंदणीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांना एक पत्रही लिहिले आहे. रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे.





























































