
काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोखरासाठी झेपावलेले एक विमान लगेचच कोसळून 18 जण ठार झाले. या अपघातात फक्त वैमानिक बचावला आहे. सौर्य एअरलाइन्सचे हे बॉम्बार्डियर विमान नियमित देखभाल सेवेसाठी दोन कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचायांसह 19 जणांना घेऊन पोखराकडे निघाले होते. कंपनीचे तंत्रज्ञ मनु राज शर्मा यांची पत्नी प्रिझा खतिवडा आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा अधिराज शर्मा यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
View this post on Instagram

























































