भ्रष्टाचाराचे आरोप करणारे फडणवीस म्हणतात तटकरेंना मतदान करा!

खोके सरकारमध्ये अजित पवार गट सामील होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घसा फोडून सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. मात्र कालपर्यंत भ्रष्टाचाराच्या पुराव्याच्या फायली नाचवणारे फडणवीस आज तटकरेंना मते देण्यासाठी  रायगडकरांना आवाहन करीत होते, परंतु भाजपचा हा ‘वॉशिंग मशीन’ कारभार सर्वांना माहीत असल्याने मतदारराजा आता भुलणार नाही अशी चर्चा या सभेनंतर सुरू होती.

सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी आज फडणवीस यांनी पेणमध्ये सभा घेतली. अपेक्षेप्रमाणे त्यांनी मोदी नामाचा जप करत भाषण आटोपते घेतले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तटकरेंना मते द्या, असे आवाहन केले.