ऑस्करचे नियम बदलले

 

ऑस्कर अकादमीने 2 मार्च 2025 सालच्या पुरस्कारांसाठी  नवे नियम, प्रोटोकॉलला मंजुरी दिली आहे. नव्या नियमांनुसार एक आठवडा आधी प्रदर्शित झालेली फिल्म असेल, तर ती ऑस्कर पुरस्कारासाठी पात्र नसेल.

पारंपरिक सिनेमागृहांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्कर अपॅडमीने सिनेमांच्या पात्रता नियमांत बदल केले आहेत. बेस्ट पिक्चर श्रेणीसाठी अमेरिकेच्या मार्पेटमध्ये एक आठवडा क्वालिफाइंग रन असेल. तसेच 45 दिवसांच्या आत अमेरिकेच्या 10 शहरांमध्ये सिनेमा सलग प्रदर्शित होणे आवश्यक असेल. नवे नियम संगीतकारांच्या हिताचे आहेत. एखाद्या फिल्मला संगीत दिलेल्या जास्तीत जास्त तीन संगीतकारांना वैयक्तिक ऑस्कर जिंकता येईल. याआधी एका फिल्मच्या संगीतकारांचा एक ग्रुप म्हणून विचार व्हायचा. याच श्रेणीतील पुरस्कारांसाठी 15 ते 20 नावे शॉर्टलिस्ट होतील.