अॅपलला परके केले नसते  तर…सहसंस्थापकाची घालमेल आली समोर

आयफोन आणि आयपॅड बनवणारी अमेरिकेची ‘अॅपल’ कंपनी आज जगातील टॉप कंपन्यांच्या यादीत आहे. तिची मार्केट पॅप 2.831 ट्रिलियन आहे. विचार करा ‘अॅपल’ कंपनीचा 1 टक्का शेअर ज्याच्याकडे असेल तो किती अब्जाधीश होईल, मात्र एक असा इसम होता, ज्याच्याकडे अॅपल कंपनीचे 10 टक्के भागीदारी होती.  त्या व्यक्तीचे दुर्दैव असे की, त्याने अवघ्या 800 डॉलरमध्ये आपली भागीदारी विकली. या दुर्दैवी इसमाचे नाव रोनाल्ड वेन आहे. अॅपलच्या तीन संस्थापकांपैकी एक होता.

कर्जाला घाबरले

कंपनीचे सगळे कर्ज आपल्यालाच फेडावे लागेल की काय, असे त्यांना वाटू लागले. कारण स्टीव जॉब्जने एक ऑर्डर पूर्ण करण्यासाठी 15 हजार डॉलरचे कर्ज काढले होते. त्यांना 100 कॉम्प्युटर तयार करण्याचे कॉण्ट्रक्ट मिळाले होते, मात्र या कामाचे पैसे मिळतील का, याची चिंता रोनाल्ड वेन यांना होती.