रायगड किल्ल्याला पांढऱया शुभ्र ढगांची चादर

 

रायगड म्हटले की, किल्ले समोर येतात. धबधबे आणि उंच डोंगरांनी रायगडला चौफेर वेढलेले आहे. यासोबतच मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची ओळख असलेला रायगड किल्ला राज्याची राजधानी म्हणून ओळखल जातो. सध्या रायगड किल्ल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी रायगड जिह्यात अवकाळी पाऊस झाला. याच दरम्यान स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पांढऱया शुभ्र ढगांनी झाकोळून गेला होता. हे अनोखे दृश्य अनंत देशमुख यांनी आपल्या मोबाईल पॅमेऱयात पैद केले.

रायगड किल्ला पांढऱया शुभ्र ढगांनी झाकोळून गेल्याचे मनमोहक दृष्य सोशल मीडियावर प्रसारित होताच ते अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. काही तासा नंतर किल्ल्यावरील ढगांची चादर दूर झाली आणि किल्ले रायगडचे पुन्हा एकदा दर्शन झाले. पावसाळ्यात अनेक पर्यटक रायगड किल्ल्याला भेट देतात. परंतु, मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने रायगड किल्ला पांढऱया शुभ्र ढगांनी झाकोळून गेला होता.

रायगडमधील पर्यटन स्थळे

रायगडमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये पॅमल व्हॅली, भातसा नदी खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, कळसुबाई शिखर, घाट देवी मंदिर, अमृतेश्वर मंदिर, वैतरणा धरण, विहीगाव धबधबा यांचा समावेश आहे.