राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत, उपकार विसरणारे नाहीत, असा माझा आतापर्यंत समज होता; परंतु ते अलीकडे जातीवाद करत आहेत. धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
हिंगोली जिल्हय़ाच्या दौऱयावर असताना अचानक मनोज जरांगे पाटील यांची प्रपृती खराब झाली. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधूनच त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. बीड जिल्हय़ातील संवेदनशील राजकीय परिस्थितीवरून त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे हे प्रामाणिक नेते आहेत असे आपल्याला वाटत होते; परंतु ते प्रामाणिक नाहीत, जातीवाद करत आहेत. असा हल्लाबोल जरांगे यांनी केला. धनंजय मुंडे हे सध्या मला मारण्याची भाषा करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.