साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 28 एप्रिल ते शनिवार 4 मे 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – रागावर ताबा ठेवा

गुरू ग्रहाचे वृषभेत राश्यांतर. मंगळ, नेपच्युन युती. रागावर ताबा ठेवल्यास योग्य निर्णय घेता येईल. व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करा. शब्द जपून वापरा. नोकरीत प्रगती होईल. मनाप्रमाणे बदलाची संधी लाभेल. धंद्यातील करार घाईत नको. मोह टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांचे सहकार्य मिळेल.

शुभ दिनांक – 28, 29

वृषभ – तणाव जाणवेल

वृषभेत गुरू महाराजांचे राश्यांतर, चंदु, बुध लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, चिंता जाणवेल. कोणताही निर्णय घाईत नको. भावनेच्या आहारी न जाता विचार करा. नोकरी टिकवा. धंद्यात फसवा फायदा पाहू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. मानहानी सहन करा.

शुभ दिनांक  – 1, 2

मिथुन – योजनांकडे लक्ष द्या

वृषभेत गुरूचे राश्यांतर, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर मनस्ताप. नोकरीच्या कामात आळस नको. धंद्यात वाढ होईल. लाभ, अहंकार ठेऊ नका. महत्त्वाची किचकट कामे रेंगाळत ठेऊ नका. आळसाने नुकसान होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांकडे लक्ष द्या. लोकांच्या समस्या सोडवा.

शुभ दिनांक  – 28, 29

कर्क – कामाचा व्याप राहील

कर्केच्या एकादशात गुरू राश्यांतर, चंद्र, बुध लाभयोग. अडचणीवर मात करून या सप्ताहात यश खेचावे लागेल. संयम, नम्रता याचा उपयोग होईल. नोकरीत कामाचा व्याप राहील. धंद्यात दगदग, धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्तुतीला भाळून जाऊ नका. सहनशीलता ठेवा. लोकप्रियता वाढेल.

शुभ दिनांक  – 1, 2

सिंह – लोकप्रियता वाढेल

सिंहेच्या दशमेषात गुरू राश्यांतर, सूर्य, चंद्र लाभयोग. चर्चेत वाद, तणाव जाणवेल. शब्द शस्त्र ठरू शकतातत, जपून वापरा. प्रवासात सावध रहा. नोकरीत प्रशंसनीय कामगिरी होईल. चांगला बदल शक्य. धंद्यात रागावर ताबा ठेवा. हिशेब नीट करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल.

शुभ दिनांक  – 28, 29

कन्या – संयमी प्रतिक्रिया द्या

वृषभेत गुरूचे राश्यांतर तुम्हाला दिलासा देणारे आहे. चंद्र, बुध लाभयोग. बुद्धिचातुर्य जाणवेल. संयमी प्रतिक्रिया ठेवा. यश मिळवा. मानसिक तणाव सहन करावा लागेल. नोकरीच्या कामात चूक टाळा. धंद्यात मोह टाळा. कामात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढले तरी गुप्त कारवाया त्रस्त करतील.

शुभ दिनांक  – 30, 1

तुळ – कायद्याला धरून बोला

वृषभ राशीत गुरू ग्रहांचे राश्यांतर, सूर्य, चंद्र लाभयोग. विरोधाला कमी लेखू नका. नम्रता ठेवा. कायद्याला धरून शब्द वापरा. नोकरीत प्रभाव राहील. वरिष्ठ कौतुक करतील. धंद्यात वाढ होईल. क्षुल्लक तणाव जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरा-मोठय़ांचा सहवास लाभेल. ज्ञानात भर पडेल. मैत्री वाढेल.

शुभ दिनांक  – 28, 29

वृश्चिक – ध्येयाकडे लक्ष द्या

वृषभ राशीत गुरूचे राश्यांतर, गुरू बल वाढवणारे आहे. चंद्र, बुध लाभयोग. प्रत्येक दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. मोहाला, कौतुकाला बळी पडू नका. मित्र, नातलग यांच्याशी जपून वागा. नोकरीच्या कामात हलगर्जीपणा नको. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देण्यापेक्षा ध्येयाकडे लक्ष द्या.

शुभ दिनांक  – 3, 4

धनु – नवे परिचय होतील

वृषभेत गुरू ग्रहांचे राश्यांतर, सूर्य चंद्र लाभयोग. प्रत्येक दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. गुप्त कारवयांना विरोधकांना शह देणे सोपे समजू नका. नोकरीत प्रभाव राहील. नवे परिचय होतील. धंद्यात वस्तु जपा. लाभ वाढेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्याचा विस्तार होईल. जनसंपर्क वाढेल. प्रतिष्ठा लाभेल.

शुभ दिनांक  – 28, 30

मकर – कार्याला गती मिळेल

वृषभ राशीतील गुरू महाराजांचे राश्यांतर, चंद्र, बुध लाभयोग दिशादर्शक ठरेल. कार्याला गती मिळेल. अहंकार नको. कुणाच्याही बोलण्याला बळी पडून निर्णय घेऊ नका. निरीक्षण करा. संधीची वाट पहा. नोकरीत प्रभाव राहील. सहकारी स्पर्धा करतील. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या.

शुभ दिनांक  – 3, 4

कुंभ – कर्जाचे काम होईल

वृषभ राशीत गुरू, सूर्य, चंद्र लाभयोग. आठवडा महत्त्वाचा ठरेल. कठीण, महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत जम बसेल. बढती, बदली, कौतुक होईल. धंद्यात नवे काम मिळेल. कर्जाचे काम होईल. सर्वत्र कायदा पाळा. अहंकार ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच ठरवता येतील.

शुभ दिनांक  – 28, 29

मीन – योजनांना गती मिळेल

वृषभेत गुरू राश्यांतर, मंगळ, नेपच्युन युती. प्रत्येक दिवस प्रेरणादायी, आत्मविश्वास वाढवणारा आहे. वाहन जपून चालवा. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्याला कलाटणी मिळेल. भागीदार गुंतवणूक करणारे मिळतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या धाडसाचे कौतुक होईल. योजनांना गती मिळेल. स्पर्धेत यश मिळेल.

शुभ दिनांक  – 29, 30