ब्रिटिश एअरवेज विरोधात 52 कोटींचा दावा ठोकला

स्विस व्यावसायिकाने ब्रिटिश एअरवेज पंपनीवर सुमारे 52 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. बेलीज लिकरच्या डब्यांवर घसरल्याने त्याच्या मेंदूला दुखापत झाल्याचा व्यावसायिकाचा आरोप आहे. ही घटना 2017 सालची आहे. अँड्रीयाज वुचनर नावाचा प्रवासी लंडन येथून हिथ्रोला जात असताना ही घटना घडली. अँड्रीयाज वुचनर बीए डेस्कच्या दिशेने जात असताना, ते बेलीज लीकरच्या डब्यांवर घसरले. त्यांचे डोके जमिनीवर आपटले. मेंदूला मार बसला. त्याते गंभीर जखमी झाले असे त्यांनी कोर्टात सांगितले.

असे झाले नुकसान

अँड्रीयाज वुचनरच्या मेंदूला दुखापत झाल्यामुळे त्यांना डोकेदुखी, विस्मरण, एकाग्रतेचा अभाव अशा समस्या उद्भवल्या. परिणामी ते कामावर लक्ष पेंद्रीत करू शकले नाहीत आणि त्यांची पंपनी बंद पडली. या सगळ्याच्या नुकसानभरपाईची मागणी करत त्यांनी ब्रिटिश एअरवेजला कोर्टात खेचले आहे.

– याआधी फेब्रुवारी 2021 मध्ये एक लाख 30 हजार पौंड नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र आता पुन्हा केसची सुनावणी सुरू झाली आहे. ब्रिटिश एअरवेजने निष्काळजीपणा केला होता की नाही, यादृष्टिने सुनावणी होईल.

– एअरवेजने ही रक्कम नाकारली आहे. केवळ अपघाताच्या परिस्थितीवर नव्हे तर दुखापतीचे प्रमाण, त्याची कारणे, पंपनीची दिवाळखोरी तसेच पंपनीचा भूतकाळ आणि भविष्यातील कामगिरी यावर सगळ्या गोष्टी असतील, असे ब्रिटिश एअरवेजचे बॅरिस्टर टॉम बर्ड यांनी सांगितले.