>> नीलिमा प्रधान
मेष – नोकरीत बदल शक्य
मेषेच्या धनेषात सूर्य, शुक्र हर्षल युती. राग वाढवणाऱया घटना आजूबाजूला सतत घडत राहतील. समतोल राखून हुशारीने आपली कामे करा. नोकरीत चांगला बदल शक्य. परदेशात जाण्याची संधी. कामाची प्रशंसा होईल. जमीन, घर, खरेदी-विक्रीत लाभ होईल. किचकट प्रश्न सोडवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
शुभ दिनांक : 16, 17
वृषभ – अनाठायी खर्च टाळा
स्वराशीत सूर्य, रवि, गुरू युति. दूरदृष्टिकोनातून चांगला निर्णय घ्याल. नवीन परिचयावर विश्वास ठेवू नका. अनाठायी खर्च टाळा. धंद्यात जम बसवा. हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज लोकांचा सहवास लाभेल. एखादे गुप्त प्रकरण समजेल. कुणाकडेही प्रतिक्रिया व्यक्त करण्याची घाई करू नका. गैरसमज दूर ठेवा.
शुभ दिनांक : 17, 18
मिथुन – कायदा पाळा
मिथुनेच्या व्ययेषात सूर्य, शुक्र, हर्षल युती. प्रत्येक दिवस यश देईल. कायदा पाळून कामे करा. नोकरीत तुमच्या कामाशी स्पर्धा होईल. कोणताही प्रसंग निभावून नेता येईल. धंद्यात आळस नको. फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दुसऱयावर अवलंबून न राहता स्वत प्रत्येक कामात लक्ष द्या. कुणालाही कमी समजू नका.
शुभ दिनांक : 12, 13
कर्क – परिचय फायदेशीर
कर्केच्या एकादशात सूर्य, चंद्र शुक्र लाभयोग. सोमवारपासून कार्याला गती मिळेल. नोकरीधंद्यात जम बसेल. नवे कंत्राट घ्या. वसुली करा. परिचय फायदेशीर ठरतील. अविवाहितांना स्थळे येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जोमाने कार्य करा. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. वरिष्ठ मदत करतील. समाजहितासाठी आर्थिक सहाय्य वापरा.
शुभ दिनांक : 16, 17
सिंह – प्रवासात सावध रहा
सिंहेच्या दशमेषात सूर्य राश्यांतर, शुक्र, शनि लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. वाद टाळा. प्रगतीचा नवा मार्ग तुमच्या क्षेत्रात मिळेल. नोकरीधंद्यात वाढ होईल. वरिष्ठांचे, भागीदारांचे सहकार्य मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव, दडपण असले तरी प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल.
शुभ दिनांक : 12, 18
कन्या – कामांना गती मिळेल
कन्येच्या भाग्येषात सूर्य, चंद्र, गुरू लाभयोग. अनेक कोडी उलगडतील. कठीण, अडचणीत आलेल्या कामांना गती देता येईल. प्रवासात, वादात सावध रहा. नोकरीत सुसह्यता जाणवेल. मित्रांना दुखवू नका. धंद्यात सतर्क रहा. मोह, व्यसन नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. कुणालाही कमी समजू नका.
शुभ दिनांक : 12, 18
तूळ – प्रकृतीकडे लक्ष द्या
तुळेच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोग. दगदग, धावपळ होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन विचार, भावना कुठेही व्यक्त करताना सावध रहा. उतावळेपणाने केलेली कृती त्रासदायक ठरेल. मैत्रीत, नात्यात गैरसमज उद्भवतील. अनाठायी खर्च टाळा. धंद्यात, नोकरीत चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक : 12, 13
वृश्चिक – समस्या सोडवाल
वृश्चिकेच्या सप्तमेषात सूर्य, चंद्र, गुरू लाभयोग. अडचणीत आलेली कामे नव्याने सुरू करा. इतरांना मदत करताना स्वतचा पैसा, वेळ याबाबत विचार करा. नोकरीतील समस्या सोडवाल. धंद्यात तूर्तास नवा विचार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विरोध संपला नसला तरी कार्यात बाजी माराल. जवळच्या लोकांना जपावे लागेल.
शुभ दिनांक : 15, 16
धनु – नोकरीत व्याप होतील
धनुच्या षष्ठेशात सूर्य, चंद्र, शुक्र लाभयोग. शारीरिक, मानसिक दडपण येईल. प्रवासात सावध रहा. तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. सतर्क, खंबीर पण नम्र रहा. नोकरीत व्याप होतील. धंद्यात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात कट-कारस्थाने रचली जातील. योजनांना पूर्ण करणे कठीण होईल.
शुभ दिनांक : 12, 18
मकर – महत्त्व वाढेल
मकरेच्या पंचमेषात सूर्य, चंद्र, गुरू लाभयोग. कुटुंबाचे, सहकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वासात भर पडेल. भावना, विचार घाईत व्यक्त करू नका. नोकरीत चांगल्या घटना घडतील. धंद्यात खर्च होईल. कायदा पाळा. कठोर शब्द नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या मदतीची अपेक्षा ठेवली जाईल.
शुभ दिनांक : 14, 18
कुंभ – अडचणींतून मार्ग शोधा
कुंभेच्या सुखस्थानात सूर्य, चंद्र, शुक्र लाभयोग. अडचणी, अडथळे यातून मार्ग शोधावा लागेल. कायदा पाळा. अनाठायी खर्च होईल. नोकरीच्या कामात चिडचिड होईल. धंद्यात वाढ होईल. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप, टीका होतील. तुमचे विचार घातक ठरवले जातील. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.
शुभ दिनांक : 12, 16
मीन – कामाचे कौतुक होईल
मीनेच्या पराक्रमात सूर्य, चंद्र, गुरू लाभयोग. अडचण आल्यावर प्रेमाने पुढे जाल. कार्याला नवी दिशा मिळेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात नवे धोरण राबवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रकरणे लक्षात येतील. प्रगतीचा मार्ग वेगाने गाठता येईल. प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळेल. रागावर ताबा ठेवा. स्पर्धेत यश मिळेल. प्रसिद्धी लाभेल.
शुभ दिनांक : 14, 18