अध्यात्म जाणून घेण्यासाठी गेलो होतो; ’तारक मेहता’चा सोढी तीन आठवडय़ांनी परतला!

तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील रोशन सिंह सोढी तीन आठवडय़ांनंतर शुक्रवारी घरी परतला. 22 एप्रिलपासून बेपत्ता झाल्याची तक्रार सोढीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सांसारिक व्यवहार सोडून आध्यात्मिक प्रवास करण्यासाठी आपण तीन आठवडे बेपत्ता होतो, अशी कबुली अभिनेता अभिनेता गुरचरण सिंगने दिली. या तीन आठवडय़ांत आपण अमृतसर, लुधियानासह अनेक शहरांतील गुरुद्वारांना भेट दिली, परंतु नंतर लक्षात आले की, आता घरी परत जायला हवे. म्हणून आपण परत आलो आहोत, असे सोढी म्हणाला.

22 एप्रिल रोजी सोढी दिल्लीतील घरातून मुंबईला रवाना झाला, पण ना विमानतळावर पोहोचला ना घरी परतला. यानंतर दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुरुचरणने 22 एप्रिल रोजी एटीएममधून 7,000 रुपये काढले होते, त्यानंतर त्याचा पह्न बंद होता. त्यामुळे हा प्रकार अपहरणाचा असू शकतो, अशी भीती सोढीच्या कुटुंबाला वाटत होती.

कुटुंब सर्वकाही असल्याची जाणीव झाल्याने परतलो

– गुरुचरण सिंग ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या सुरुवातीपासून 2023 पर्यंत एक भाग राहिले. नंतर निर्मात्यांसोबत काही वाद झाल्याने त्यांनी हा शो सोडला होता. गुरुचरणचे वडील हरगीत सिंह यांनी 25 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीतील पालम पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल
केली होती. पोलिसांना पालम परिसरातून
काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत ज्यात अभिनेता बॅग घेऊन रस्ता ओलांडताना दिसत होता.

– तपासात पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले होते, ज्यात सोढी जाताना दिसतोय. 24 एप्रिलपर्यंत त्याचा फोन सुरू होता, पण नंतर बंद येत होता. सोढी लवकरच लग्न करणार होता. पोलिसांनी त्याच्या फोनच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील तपासले असून त्यात विचित्र गोष्टी आढळल्या तसेच अनेक आर्थिक व्यवहार केल्याचेही दिसून आले होते.