साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 5 मे ते शनिवार 11 मे 2024

>> नीलिमा प्रधान

 

मेष – नोकरीच्या कामात प्रगती

स्वराशीत बुध, सूर्य-शनी लाभयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर ताबा ठेवा, वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा, वक्तव्ये जपून करा. नोकरीच्या कामात प्रगती-बढती होईल. खरेदी-विक्रीत लाभ. अक्षय्य तृतीया लाभदायक ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत जिद्द ठेवा, अहंकार नको.
शुभ दिनांकः 10, 11

वृषभ – अहंकार दूर ठेवा

वृषभेच्या व्ययेषात बुध, चंद्र-मंगळ युती. व्यवसाय, मित्र-नातलग यांमध्ये वाद, गैरसमज, तणाव होतील. अहंकाराची भाषा समस्या निर्माण करेल. नोकरी टिकवा. नवीन परिचय धोका देईल. धंद्यात तारतम्य ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कायदा मोडून कोणतेही डावपेच टाकू नका, प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांकः 10,11

मिथुन – वर्चस्व वाढेल

मिथुनेच्या एकादशात बुध, चंद्र -शुक्र युती. महत्त्वाची कठीण कामे करा. नोकरीत वर्चस्व दिसेल, कामात बदल करण्याची शक्यता, धंद्यात लाभ-वाढ-वसुली होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील योजना पूर्ण करा, तत्परता दाखवा, वरिष्ठांच्या समवेत चर्चेत यश मिळेल. पद-अधिकार टिकवता येईल. स्पर्धेत पुढे जाण्याची जिद्द ठेवा. कायद्याची कामे विचारपूर्वक करा.
शुभ दिनांकः 5,11

कर्क – प्रेरणादायक वातावरण

कर्केच्या दशमेषात बुध, चंद्र-शुक्र युती. अनेक कामांना गती मिळेल. उत्साही, प्रेरणादायक वातावरण राहील. कला-साहित्यात कल्पनाशक्ती वाढेल. प्रसिद्धी-नवे परिचय फायदेशीर, नोकरीत सुधारणा होईल. धंद्यात वाढ-लाभ होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत जुने गैरसमज दूर करता येतील. जनसंपर्क वाढेल. योजना पूर्ण कराल. आर्थिक सहाय्य मिळेल.
शुभ दिनांकः 5,6

सिंह – रागावर ताबा ठेवा

सिंहेच्या भाग्येषात बुध, सूर्य-शनी लाभयोग. ताण-तणाव, दडपण निर्माण होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला राग वाढवणाऱया घटनांचा विचार नको, प्रवासात धोका पत्करू नका. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य, प्रभाव राहील. धंद्यात वाद नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत लोकप्रियता, सहकार्य मिळेल, उत्साह राहील. योजना पूर्ण करा. कौटुंबिक कामात दगदग होईल.
शुभ दिनांकः 10,11

कन्या – फसगत टाळा

कन्येच्या अष्टमेषात बुध, चंद्र-गुरू युती. कोणतीही समस्या हळूहळू सोडवा. उतावळेपणा-अहंकार ठेवू नका. वाहन जपून चालवा, रागावर ताबा ठेवा. धंद्यात फसगत टाळा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रेमाने वागा, कुणालाही कमी लेखू नका. मोठेपणा नम्रतेने खुलेल.
शुभ दिनांकः 5,6

तूळ – नावलौकिक वाढेल

तूळेच्या सप्तमेषात बुध, सूर्य-शनी लाभयोग. विरोधाला प्रेमानेच जिंकावे लागेल. सोप्या वाटणाऱया गोष्टी कधीतरी अचानक कठीण होतात. धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक. कला-साहित्याला प्रेरणा मिळेल, नावलौकिक वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांकडून मोठे आश्वासन मिळेल.
शुभ दिनांकः 6,11

वृश्चिक – कामात सतर्क रहा

वृश्चिकेच्या षष्ठेषात बुध, चंद्र- गुरू युती. नातेसंबंध-मैत्री जपणे कठीण होईल. अहंकार, प्रतिस्पर्धा टाळणे महत्त्वाचे ठरेल. नोकरीच्या कामात सतर्क रहा. धंद्यात गोड बोलण्यावर भाळू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत दगाफटका होईल. नम्रता, सहनशीलता यावर यश निर्भर असेल. अनाठायी खर्च वाढेल.
शुभ दिनांकः 5,10

धनु – प्रवासात सावध रहा

धनुच्या पंचमेषात बुध, चंद्र-मंगळ युती. विरोधक राग वाढवण्याचा प्रयत्न करतील. प्रवासात सावध रहा. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा-लोकप्रियता टिकवून ठेवाल.योजनांकडे लक्ष द्या, कायद्याच्या कक्षेत राहूनच कामे करा.
शुभ दिनांकः 6,11

मकर – महत्त्वाची कामे करा

मकरेच्या चतुर्थात बुध, चंद्र-गुरू युती. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. कायद्याला धरूनच कोणताही मुद्दा मांडा. नोकरीत दगदग-तणाव. धंद्यात तारतम्य ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत करार, डावपेच यामध्ये उतावळेपणा नको. संधी पुढे मिळेलच.
शुभ दिनांकः 5,6

कुंभ – प्रत्येक दिवस यशाचा

कुंभेच्या पराक्रमात बुध, चंद्र-शुक्र युती. प्रत्येक दिवस यशाचा, उत्साहाचा ठरेल. तरीही कोणताही मुद्दा मांडताना अहंकार नको. कायदा पाळा. नोकरीत वर्चस्व, कौतुक होईल. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत योजना पूर्ण कराल.
शुभ दिनांकः 5,6

मीन – कामाची प्रशंसा होईल

मीनेच्या धनेषात बुध, चंद्र-शुक्र युती. महत्त्वाची, किचकट कामे करा. खरेदी-विक्रीत लाभ होईल. नोकरीत बढती-कामाची प्रशंसा होईल. धंद्यात चांगला बदल, वाढ-थकबाकी मिळेल. योग्य प्रकारे गुंतवणूक करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्या कार्याचे कौतुक होईल. कार्यासाठी निधी मिळवा.
शुभ दिनांकः 10,11