जगभरातून थोडक्यात बातम्या …

विप्रोच्या सीओओचा राजीनामा

विप्रोचे सीओओ अमित चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमित यांचा पंपनीतील शेवटचा दिवस 31 मे असणार आहे, अशी माहिती एक्सचेंज फायलिंगमध्ये देण्यात आली आहे. विप्रोने अमित यांच्या जागी संजीव जैन यांची पंपनीचे नवीन सीओओ म्हणून नियुक्ती केली आहे, ते बंगळुरूमध्ये काम करतील. या महिन्यात विप्रोचा राजीनामा देणारे अमित हे दुसरे अधिकारी आहेत.

 

त्रिनिदादचे पंतप्रधान श्री चरणी नतमस्तक

त्रिनिदाद – टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांनी शनिवारी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराला सपत्नीक भेट देत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिष्टमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते. दक्षिण अमेरिका खंडातील त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचे शिष्टमंडळ पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्यासह सध्या हिंदुस्थान दौऱयावर आहेत.

पंबोडियाला जाणे टाळा

केंद्र सरकारने नागरिकांसाठी एक सूचना जारी केली असून यात पंबोडिया देशात नोकरी साठी जाणाऱया नागरिकांना सतर्क केले आहे. हिंदुस्थानी नागरिकांनी परराष्ट्र मंत्रालयाद्वारे मान्य असलेल्या अधिकृत एजंट्सच्या माध्यमातूनच नोकरीसाठी नागरिकांनी परदेशात जावे. सूचनामध्ये सरकारने नोकरीचे आमिष दाखवून होणाऱया फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना थायलंडमार्गे लाओस येथे रोजगार देण्याचे आमिष दाखविले जात आहे, मात्र यात काही तथ्य नसल्याचे पेंद्र सरकारने म्हटले आहे.

शस्त्रक्रियेनंतर कापड पोटात राहिले

कर्नाटकातील कोलार येथील एका सरकारी रूग्णालयातील डॉक्टरांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरने महिलेच्या पोटात एक कापड ठेवले. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी या महिलेच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर गर्भाशयात कपडय़ाचा तुकडा चिकटल्याचे दिसले. या महिलेचे नाव चंद्रिका असून ती 20 वर्षांची आहे. कोलार येथील एनएनआर रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर तिच्या पोटात कापडाचा तुकडा विसरले.