साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 19 मे ते शनिवार 25 मे 2024

>> नीलिमा प्रधान

मेष नवीन परिचय प्रेरणादायी

मेषेच्या धनेषात शुक्र, सूर्य-प्लुटो त्रिकोणयोग. सप्ताहात अडचणी, तणाव असली तरीही संयमाने, हुशारीने आणि स्नेहाने वागून कार्य करून घ्या. नवीन परिचय प्रेरणा देणारे ठरतील. नोकरीत धावपळ होईल. धंद्यात वाढ होईल. नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमची लोकप्रियता वाढेल. प्रवासात सावध रहा.

शुभ दिनांक : 21, 25

वृषभ  – कामांना गती मिळेल

स्वराशीत शुक्र, सूर्य-नेपच्यून लाभयोग. रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. गैरसमज, तणाव, वाद दूर करण्याची संधी मिळेल. कार्यातील अडचणी कमी होतील. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल. चर्चेत सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील पिछेहाट दूर करून नव्याने तयारी करा. जनसंपर्क चांगला ठेवा.

शुभ दिनांक : 19, 24

मिथुन अहंकार दूर ठेवा

मिथुनेच्या व्ययेषात शुक्र, चंद्र-बुध प्रतियुती. कोणताही निर्णय सावधपणे घ्या. कायद्याच्या कक्षा लक्षात ठेवा. अतिशयोक्ती, अहंकार दूर ठेवा. नोकरी टिकवा. कामात चूक टाळा. धंद्यात फसगत होण्याची शक्यता. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत विरोधक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. प्रतिष्ठा जपा. व्यवहारात नुकसान होईल.

शुभ दिनांक : 19, 23

कर्क  – किचकट कामे करा

कर्केच्या एकादशात शुक्र, सूर्य-प्लुटो त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस सत्कारणी लावा. किचकट, कठीण कामे करा. प्रकृतीत सुधारणा होईल. मित्र, नातलग भेटतील. कला, साहित्याला वाव मिळेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील वाद, समस्या मिटवा. नवी योजना राबवा. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल.

शुभ दिनांक : 19, 23

सिंह कामांची पूर्तता होईल

सिंहेच्या दशमेषात शुक्र, चंद्र-बुध प्रतियुती. अनेक कामांची पूर्तता करता येईल. भेटीत, चर्चेत प्रगतीचा नवा आराखडा बनवता येईल. नोकरीत बढती होईल. धंद्यात वाढ होईल. वाद टाळा. प्रवासात काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचा सहवास मार्गदर्शक ठरेल. विचारांना चालना देणारे डावपेच ठरवता येतील.

शुभ दिनांक : 19, 21

कन्या बोलताना सावध रहा 

कन्येच्या भाग्येषात शुक्र, सूर्यöप्लुटो त्रिकोणयोग. अनेक दिवसांपासून रखडलेले काम मनाप्रमाणे करून घेता येईल. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. प्रकृतीत सुधारणा होईल. बोलताना सावध रहा. प्रत्येक दिवस प्रगतीचा उच्चांक गाठणारा ठरेल. नोकरीत उत्तम बदल होईल. धंद्यात नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा विस्तार करा.

शुभ दिनांक : 21, 22

तूळ प्रवासात काळजी घ्या

तुळेच्या अष्टमेषात शुक्र, सूर्य-चंद्र षडाष्टक योग. कोणतेही विधान सावधपणे करा. भावनांच्या आहारी न जाता नम्रपणे वागा. प्रकृतीची काळजी घ्या. विरोधक टीका करण्याची वाट पाहत असतात हे लक्षात ठेवा. धंद्यात फसगत टाळा. वारसा हक्कातील हिस्सा मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत गुप्त कारवायांना ओळखून वागा. प्रवासात काळजी घ्या.

शुभ दिनांक : 23, 24

वृश्चिकसंधीचा उपयोग करा

वृश्चिकेच्या सप्तमेषात शुक्र, सूर्य-प्लुटो त्रिकोणयोग. जीवनातील त्रुटी भरून काढण्याची संधी मिळेल. त्याचा पुरेपूर उपयोग करा. नोकरीत प्रभाव वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती, यश मिळेल. धंद्यात कलाटणी मिळेल. करार करताना सल्ला घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका निभावाल. परिचय उत्साहवर्धक ठरतील.

शुभ दिनांक : 19, 25

धनु कायद्याच्या कक्षा जाणा

धनुच्या षष्ठेषात शुक्र, सूर्य-चंद्र षडाष्टक योग. क्षेत्र कोणतेही असो, तारतम्य ठेवणे महत्त्वाचे. कायद्याच्या कक्षा जाणून कोणतेही विधान करा. फाजील आत्मविश्वास घातक ठरेल. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी, धंदा टिकवून ठेवा. वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत आरोप, टीका होईल.

शुभ दिनांक : 19, 20

मकर योजनांची पूर्ती करा

मकरेच्या पंचमेषात शुक्र, सूर्य-प्लुटो त्रिकोणयोग. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. अनेकांचे सहकार्य घेऊन पुढे जाता येईल. नोकरीत जम बसेल. थोरामोठय़ांच्या मदतीने कार्यभाग साधून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत बस्तान बसवा. लोकप्रियता, अधिकार वाढेल. योजनांची पूर्ती करा. घरात सुखद घटना घडेल.

शुभ दिनांक : 19, 20

कुंभ अनाठायी खर्च टाळा 

कुंभेच्या सुखस्थानात शुक्र, चंद्र-बुध प्रतियुती. उत्साहाच्या भरात कोणतीही चूक करू नका. कायदा पाळा. नवीन परिचय घातक ठरू शकतो. वस्तू जपा. चातुर्य वापरा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहून बोला. धंद्यात अनाठायी खर्च टाळा. अहंकाराने वागणे प्रतिष्ठेवर घाला घालणारे ठरू शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत प्रसंगावधान ठेवा.

शुभ दिनांक : 21, 23

मीन रागावर ताबा ठेवा

मीनेच्या पराक्रमात शुक्र, सूर्य-नेपच्यून लाभयोग. रखडलेले काम मार्गी लावता येईल. विचारांना, कल्पनेला चालना देणारा प्रसंग घडेल. संबंध सुधारतील. नोकरीत जम बसेल. धंद्यात मोठे कंत्राट वसुली करा. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत वर्चस्व वाढवणारे काम कराल. लोकप्रियता वाढेल. कला, क्रीडा साहित्यात बाजी माराल.

शुभ दिनांक : 14, 18