भारतीय विद्यार्थ्याने अॅपलचे सीईओ टीम कुकला ‘पकडले’

आयपॅड मोहीम सुरू असताना हिंदुस्थानातील एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने टिम कुक यांना आयपॅड मोहिमेतील एक मोठी चूक लक्षात आणून दिली. सोशल मीडिया युजर्सकडून प्रतिक्रिया मिळाल्यानंतर अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नवीन आयपॅड प्रो जाहिरातीत मोठी चूक आहे, असे कबूल केले. टीम कुक यांनी नव्या आयपॅड प्रो जाहिरातीला सोशल मीडिया यूजर्स कडून प्रतिक्रिया मिळाल्यानंतर चूक मान्य केली. स्टॅनपर्ह्ड विद्यापीठातील विद्यार्थी शौर्य सिन्हाने गुरुवारी एक्सवर लिहिले, स्टॅनपर्ह्डमध्ये टीम कुक यांची भेट झाली. या भेटीत त्यांना आयपॅड मोहिमे संबंधी विचारले. तेव्हा त्यांनी चूक मान्य केली. कुक खूप चांगले व्यक्ती होते, असे शौर्य सिन्हाने एक्सवर म्हटले आहे.