उन्हाळ्यात घ्या केसांची काळजी, घरच्या घरी बनवा हेअर मास्क

उन्हाळ्यात घातक यूव्ही किरणे, दमट हवा व प्रदूषणापासून संरक्षण व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा केस निस्तेज, कोरडे, राठ होण्यामध्ये होते. त्यातही ते जड पाण्याच्या संपर्कात आले की, त्यांची स्थिती अधिकच बिकट होतो आणि ते निस्तेज होऊन तुटतात. अशावेळी घरच्या घरी केसांची काळजी घेणे केव्हाही चांगले.

केसांना योग्य पोषण मिळविण्यासाठी केसांना नियमितपणे तेल लावण्याची सवय लावून घेणे. केशतेलांचे कितीतरी पर्याय बाजारात निवडीसाठी उपलब्ध असले तरीही त्यातून तुमच्या केसांसाठी योग्य घटकांचा समावेश असलेला पर्याय निवडण्याची गरज असते. कोरफड अर्थात अॅलो व्हेरा हा असाच एक घटक आहे, जो अनेक वर्षांपासून उन्हाळ्यासाठीचा सर्वात आवडता पर्याय राहीला आहे!

अॅलो व्‍हेरासह खोबरेल तेलापासून बनवण्‍यात आलेल्‍या हेअर ऑईलचे हे अद्वितीय मिश्रण केसांच्‍या मुळांच्‍या जवळपास 10 स्‍तरांपर्यंत खोलवर जाते आणि केस राठ होण्‍याला नियंत्रण करते. कोरफड केसांची वाढ होण्‍यास, केसगळतीला प्रतिबंध करण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे उन्‍हाळ्यादरम्‍यान केसांचे संरक्षण होण्‍यासोबत केसांचे आरोग्‍य सुधारते. तसेच अॅलो व्‍हेरामध्‍ये व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स संपन्‍न प्रमाणात असतात, जे टाळू व केसांचे पोषण करू शकतात, ज्‍यामुळे केस मजबूत होतात आणि केस तुटण्‍याची शक्‍यता कमी होते. तसेच, ते टाळूला शांत करण्‍यास आणि केसांमधील कोंडा कमी करण्‍यास देखील मदत करू शकते.

– केस धुण्‍यापूर्वी केसांच्या मुळांना अॅलो व्‍हेरासह खोबरेल तेलापासून बनवण्‍यात आलेल्‍या तेलाने मसाज करा आणि अर्धातास तसेच ठेवा. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा या तेलाचा वापर करा.

केस मऊ, पोषणयुक्त होण्यासाठी अॅलो व्हेरा व खोबरेल तेलाचा आधार असलेल्या केशतेलाच्या गुणकारी मिश्रणाचा अनुभव घ्या.