सावधान! ही घातक रसायने उत्पादनांमध्ये असल्यास होऊ शकतो कर्करोग

हिंदुस्थानासह जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नॅशनल सेंटर ऑफ डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चच्या 2024 ने सादर केलेल्या अहवालानुसार, 2022 मध्ये देशात कर्करोगाच्या 14 लाख नवीन रुग्णांची नोंद केली होती. धूम्रपान आणि मद्यपानामुळे हा धोका आणखी वाढतो आहे. यासाठी आपल्याला धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळले पाहिजे.

काही दिवसांपूर्वींच सिंगापूरने MDH आणि एव्हरेस्टच्या काही उत्पादनांवर बंदी घातली होती. कारण त्या मसाल्यांमध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणारी रसायने आढळून आली. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही कोणतेही उत्पादन खरेदी करणार असाल तेव्हा तुम्हाला त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादन खरेदी करताना पुढील रसायने त्या उत्पादनात असतील तर ते उत्पादन घेणे टाळावे.

कोळसा डांबर
कोळसा डांबर हे कोळसा प्रक्रियेदरम्यान तयार होणारे उप-उत्पादन आहे. हेअर डाय, शाम्पूसह अनेक त्वचेच्या उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो. जर तुम्ही ही उत्पादने नियमितपणे वापरत असाल तर तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. याशिवाय त्यांचा अतिवापर केल्याने फुफ्फुस, मूत्राशय आणि किडनीवरही विपरीत परिणाम होतो.

पॅराबेन

कॉस्मेटिक उत्पादनांच्या दीर्घ आयुष्यासाठी पॅराबेनचा वापर केला जातो. हे साबण, शैम्पू, शेव्हिंग क्रीम आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये आढळते. पॅराबेन रसायनांचा देखील आपल्या संप्रेरकांवर आणि प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यात असलेल्या उत्पादनांचा वापर केल्याने तुम्ही स्तनाच्या कर्करोगासारख्या धोकादायक आजाराचे संभाव्य रुग्ण बनू शकता.

फॅथलेट्स
परफ्यूम, हेअर स्प्रे आणि नेल पॉलिश यांसारख्या कृत्रिम सुगंधांमध्ये फॅथलेट्स सारखी रसायने वापरली जातात. त्याचा तुमच्या हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो. यामुळे स्तनाच्या कर्करोग होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही असे उत्पादन विकत घेण्यासाठी जाता तेव्हा उत्पादने व्यवस्थित पाहूनच खरेदी करावी.

फॉर्मल्डिहाइड

फॉर्मल्डिहाइड हा एक रंगहीन वायू आहे. ज्याचा तीव्र गंध आहे. जो बांधकाम साहित्य, ऑटोमोबाईल आणि कापड उद्योगातील उत्पादने तयार करण्यासाठी वापरला जातो. IARC ( इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर) सारख्या संस्थांनी देखील कबूल केले आहे की यामुळे नासोफरीन्जियल कॅन्सर आणि ल्युकेमियासारखे आजार होऊ शकतात.