राशिभविष्य – रविवार 21 एप्रिल ते शनिवार 27 एप्रिल 2024

>>नीलिमा प्रधान

मेष -वाद वाढवू नका

मेषेच्या व्ययेषात मंगळ, स्वराशीत शुक्र. सार्वजनिक अथवा कोणत्याही ठिकाणी काम करताना नम्रता, संयम ठेवा. वाद वाढवू नका. प्रवासात सावध रहा. नोकरीत वर्चस्व राहील. बढतीचा प्रस्ताव लाभेल. धंद्यात प्रगती, लाभ होईल. सौम्य भाषेत बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सन्मानाचे प्रसंग येतील. संसारात खर्च वाढेल.
शुभ दिनांक ः 23, 24

वृषभ – वसुलीचा प्रयत्न करा

वृषभेच्या एकादशात मंगळ, व्ययेषात शुक्र आहे. विरोधक गुप्त कारवाया करतील. गोड बोलून गुपित काढून घेण्याचा, नुकसान करण्याचा प्रयत्न होईल. सावध भूमिका घ्या. नोकरी टिकवा. धंद्यात लाभ, अरेरावी नको. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टीका, चुका दाखवणे, मानहानी होणे यांसारखे प्रकार होतील. नवीन परिचयात सावध रहा.
शुभ दिनांक ः 21, 22

मिथुन – महत्त्वाची कामे करा

मिथुनेच्या दशमेषात मंगळ, एकादशात शुक्र. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. कला, क्रीडा, साहित्यात संधी मिळेल. प्रगती होईल. नावलौकिक वाढेल. नोकरीत बढती, बदल शक्य. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना गतीमान करा. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाची प्रशंसा होईल.
शुभ दिनांक ः 21, 22

कर्क – गुंतवणूक वाढेल

कर्केच्या भाग्येषात मंगळ, दशमेषात शुक्र. प्रत्येक दिवस उत्कर्षाचा. अडचणी सोडवा. नोकरीत उन्नती होईल. धंद्यातील समस्या कमी होऊन योग्य भागीदार मिळेल. गुंतवणूक वाढेल. खरेदीविक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज, तणाव दूर करून जम बसवा. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. पद, जबाबदारी वाढेल.
शुभ दिनांक ः 21, 22

सिंह – चांगली संधी मिळेल

सिंहेच्या अष्टमेषात मंगळ, भाग्येषात शुक्र. प्रत्येक दिवस ऊर्जा देणारा. शक्ती देणारा ठरेल. प्रवासात सावध रहा. नोकरीधंद्यात चांगली संधी मिळेल. परदेशी जाण्याची संधी लाभेल. थकबाकी मिळवा. संयम ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच तयार कराल. नवे परिचय वाढतील. ज्ञानात भर पडणारी चर्चा होईल. घरगुती कामे होतील.
शुभ दिनांक ः 21, 23

कन्या – प्रवासात सावध रहा

कन्येच्या सप्तमेषात मंगळ, अष्टमेषात शुक्र. आत्मविश्वास वाढेल. उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. प्रत्येक दिवस विशेष ठरू शकतो. नोकरी टिकवा. चूक टाळता येईल. संयम ठेवा. धंद्यात फसगत टाळा. मोह नको. व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मत प्रदर्शनाची घाई नको. उतावळेपणा दूर ठेवा.
शुभ दिनांक ः 23, 26

तुळ – शब्द जपून वापरा

तुळेच्या षष्ठात मंगळ, सप्तमेषात शुक्र. हनुमान जयंतीपासून मनावरील दडपण कमी होईल. कुणालाही कमी समजू नका. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात चर्चा करताना सावध रहा. करार नीट करा. शब्द जपून वापरा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवे दिग्गज परिचय होतील. मुद्दा सावधपणे मांडा.
शुभ दिनांक ः 23, 26

वृश्चिक – कामाचे व्याप वाढतील

वृश्चिकेच्या पंचमात मंगळ, षष्ठेशात शुक्र. मैत्रीत, नात्यात गैरसमज, तणाव होतील. नोकरीच्या कामात व्याप होतील. धंद्यातील गुंता वाढवू नका. संयमाने बोला. नविन परिचय उत्साह देणारा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारस्थाने होतील. प्रतिष्ठा जपा. भावनेच्या आहारी जाऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिनांक ः 21, 22

धनु – लोकप्रियता वाढेल

धनुच्या सुखस्थानात मंगळ, पंचमेषात शुक्र. महत्त्वाची, कठीण कामे सप्ताहाच्या पूर्वार्धात करा. उत्साह, आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल. नोकरीधंद्यात चांगली संधी, लाभ मिळेल. नवे कंत्राट मिळेल. वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याची लोकप्रियता वाढेल. प्रसिद्धी मिळेल. योजनांना वरिष्ठ सहकार्य करतील.
शुभ दिनांक ः 21, 22

मकर – रागावर ताबा ठेवा

मकरेच्या पराक्रमात मंगळ, सुखस्थानात शुक्र. मैत्रीत, नात्यात, सहकारी वर्गात क्षुल्लक गैरसमज उद्भवतील. अहंकार नको. रागावर ताबा ठेवल्यास प्रतिमा उजळेल. नोकरीत प्रभाव राहील. कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा विस्तार होईल. चर्चेत यश मिळेल. योग्य मुद्दे तयार कराल. मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ दिनांक ः 21, 23

कुंभ – प्रवासात सावध रहा

कुंभेच्या धनेषात मंगळ, पराक्रमात शुक्र. प्रवासात, वाहन चालवताना धोका पत्करू नका. वाद वाढवू नका. नोकरीत प्रशंसनीय काम कराल. बढती, बदली होईल. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील योजना, महत्त्वाची कामे करून घ्या. चर्चेत यश मिळेल. दिग्गज व्यक्तीचा सहवास लाभेल.
शुभ दिनांक ः 24, 26

मीन – अधिकार लाभतील

स्वराशीत मंगळ, मीनेच्या धनेषात शुक्र. अडचणीत आलेली कामे पूर्ण कराल. रागावर ताबा ठेवला तर महत्त्व वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगाने पुढे जाल. अधिकार लाभतील. योजनांना पुढे न्याल. लोकप्रियतेत वाढ होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.
शुभ दिनांक ः 21, 22