‘टायटॅनिक’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॉलीवूडसाठी एक वाईट बातमी आली आहे. सुपरहिट सिनेमा टायटॅनिकपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता बर्नार्ड हिल यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने हॉलीवूड हैराण झाले आहबे., बारबरा डिक्सन यांनी सोशल मीडियावरुन ही बातमी दिली आहे.या दुःखद घटनेमुळे हॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

1997 मध्ये रिलीज झालेल्या ‘टायटॅनिक’ या सिनेमातील कॅप्टन एडवर्ड जॉन स्मिथच्या भूमिकेने बर्नार्ड हिलला खूप लोकप्रियता मिळाली. बर्नार्ड यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. 79 वर्षांचे बर्नार्ड आता या जगात नाहीत यावर चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीये. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत माहिती समोर आलेली नाही. बारबरा डिक्सन यांनी सोशल मीडियावर बर्नाड यांच्या निधनाची माहिती दिली. तिने शोक व्यक्त करत एक पोस्ट शेअऱ केली आहे. एक्सवर बर्नाडसोबत थ्रोबॅक फोटो शेअर करत बारबराने लिहीले की, “बर्नार्ड हिल यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दुःख झाले आहे. आम्ही जॉन पॉल जॉर्ज रिंगो आणि बर्ट, विली रसेलच्या 1974-1975 च्या शानदार शोमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्यासोबत काम करणे हे माझे सौभाग्य होते. बर्नार्ड हिल,तुमच्या आत्म्याला शांती लाभो असा मेसेज लिहीला आहे.

” ‘टायटॅनिक’ आणि ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ व्यतिरिक्त बर्नार्ड हिल ‘द स्कॉर्पियन किंग’, ‘द बॉईज फ्रॉम काउंटी क्लेअर’, ‘गोथिका’, ‘विम्बल्डन’, ‘द लीग ऑफ जेंटलमेन’ मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘अपोकॅलिप्स’, ‘जॉय डिव्हिजन’, ‘सेव्ह एंजल होप’, ‘एक्सोडस’, ‘वाल्कीरी’ सारखे सिनेमे आणि मालिकांसाठी लोकप्रियता मिळाली. बाफ्टा, क्रिटिक्स चॉईस आणि एमी यांसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसाठी त्याला नामांकन मिळाले आहे. 2004 मध्ये त्यांना स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड मिळाला.