अन् बिबट्या पिंजऱ्यात अडकला

सिन्नर तालुक्यातील सायाळे गावाजवळ पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने बिबटय़ाने दोधानी नदीपात्र परिसरात मुक्काम ठोकला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटय़ा अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान, वनविभागाने बुधवारी नदीकाठाजवळ पिंजरा लावला होता, त्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास बिबटय़ा अडकला. ही माहिती मिळताच नांदूरशिंगोटेचे वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांनी पथकासह घटनास्थळी येवून बिबटय़ाला मोहदरी घाटातील वनउद्यानात हलवले. तो साडेतीन वर्ष वयाचा नर आहे. तो पकडला गेल्याने परिसरातील भीती दूर झाली आहे