अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ऑनलाईन प्रवेशाची 26 जून रोजी प्रसिद्ध होणारी पहिली गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पहिली गुणवत्ता यादी 27 जुन रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे.
पहिल्या यादीनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 1 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत आहे. विद्यार्थ्यांना मिळालेला प्रवेश घ्यायचा असल्यास दिलेल्या मुदतीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया विद्यार्थी पूर्ण करू शकतात. विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा नसल्यास ते पुढील प्रवेश फेरीची वाट पाहू शकतात. मात्र या फेरीत पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास विद्यार्थ्याला प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
- 2 जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार
- 3 ते 10 जुलैदरम्यान दुसरी प्रवेश फेरी प्रस्तावित आहे.