शाकाहारी जेवणाला महागाईचा ठसका; व्हेज थाळी 9 टक्क्यांनी महागली

महागाईने होरपळणाऱया सर्वसामान्यांना पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे. क्रिसिल मार्पेट इंटेलिजेन्स अँड अॅनालिसिसने मासिक राइस रोटी रेटचा रिपोर्ट सादर केला असून यानुसार मे महिन्यात व्हेज थाळीच्या किंमतीत 9 टक्क्यांची वाढ झाली. कांदा, टोमॅटो आणि बटाटा यांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ही व्हेज थाळी महाग झाली आहे. तर दुसरीकडे नॉनव्हेज थाळीच्या किंमतीत 7 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ही थाळी आता 27.8 रुपये झाली आहे. गेल्या वर्षी मेमध्ये ही थाळी 25.5 रुपये होती. 7 टक्के किंमत घसरल्याने मांसाहारी थाळी 55.9 रुपये झाली आहे. 2023 मध्ये मे महिन्यात ही थाळी 59.9 रुपये होती.

मांसाहारी थाळी स्वस्त

शाकाहारी थाळी महाग होत असताना मांसाहारी थाळी स्वस्त झाली आहे. नॉन व्हेज थाळीची किंमत कमी होण्यामागे
ब्रॉयलर चिकनच्या किंमतीत 2 टक्के कमतरता आल्याचे सांगितले आहे.

व्हेज थाळी महाग होण्याची कारणे

टॉमेटो, बटाटा आणि कांदा यांच्या किंमतीत वार्षिक आधारावर वाढल्या आहेत. यामुळे शाकाहारी थाळीच्या किंमतीत वाढ झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये बटाटयाच्या पिकांवर रोग पडला आहे. त्यामुळे बटाटयाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तांदळाच्या किंमतीत सुद्धा वार्षिक आधारावर 13 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डाळींचे उत्पादन घटले होते. तांदूळ आणि डाळीच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किंमतीत 21 टक्के वाढ झाली आहे.

महिना            व्हेज         नॉनव्हेज

जून 2023        26.7      60.5

जुलै 2023        34.1      67.8

ऑगस्ट 2023      34.0      67.5

सप्टेंबर 2023      28.1      60.7

ऑक्टोबर 2023   27.7      58.6

नोव्हेंबर 2023     30.5      60.4

डिसेंबर 2023     29.7      56.4

जानेवारी 2024    28        52.0

फेब्रुवारी 2024     27.5      54.0

मार्च 2024        27.4      54.9

एप्रिल 2024       27.4      56.3

मे 2024          27.8      55.9