साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 09 जून ते शनिवार 15 जून 2024

>> नीलिमा प्रधान

मेषरागावर ताबा ठेवा

मेषेच्या पराक्रमात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, गुरू त्रिकोणयोग. दगदग, धावपळ वाढेल. कामात अडथळे, अडचणी वाढतील. रागावर ताबा ठेवा. समस्या वाढणार नाहीत. धोका पत्करू नका. नोकरीत यश मिळेल. कामाची प्रशंसा होईल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता राहील.

शुभ दिनांक 12, 13

वृषभगुंतवणूक करा

वृषभेच्या धनेषात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, मंगळ केंद्रयोग. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. वाहनावर ताबा ठेवा. नोकरीच्या कामात बुद्धिचातुर्य दाखवण्याची संधी मिळेल. गुंतवणूक करा. खरेदीविक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल. चर्चेत यश मिळेल. स्पर्धेत यश मिळेल.

शुभ दिनांक ः 11, 15

मिथुनतणाव दूर होईल

स्वराशीत शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, शनि प्रतियुती. अडचणीत आलेली कामे चतुराईने पूर्ण करा. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. धंद्यातील चूक सुधारता येईल. काम वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दुरावा, तणाव दूर होईल. कोणाचाही सल्ला घेऊ नका. तो उपयोगी पडणार नाही. मेहनत घ्या. यश खेचून आणा. स्वतचे स्थान स्थिर ठेवा.

शुभ दिनांक ः 14, 15

कर्कव्यवहाराने वागा

कर्केच्या व्ययेषात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, गुरू लाभयोग. उतावळेपणा, अतिरेक, अहंकार ठेवल्यास आतापर्यंतच्या कामावर पाणी सोडावे लागेल. भावना व कर्तव्य यांचा मेळ घाला. मगच निर्णय घ्या. नोकरीत सतर्क रहा. धंद्यात नुकसान टाळता येईल. व्यसन, मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. आरोपांना उत्तर देण्याची घाई नको.

शुभ दिनांक ः 10, 11

सिंहकर्जाचे काम करा

सिंहेच्या एकादशात शुक,dर बुध, सूर्य. चंद्र, गुरू लाभयोग. बुधवारपासून सर्व कामे सुरळीत होतील. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहाल. नोकरीत बढती, बदली होण्याची शक्यता. कर्जाचे काम करा. कोणतेही किचकट काम रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना पुढे न्याल. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील.

शुभ दिनांक ः 14, 15

कन्याप्रवासात सावध रहा

कन्येच्या दशमेषात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, गुरू त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर प्रवासात सावध रहा. कोणतेही प्रकरण जास्त ताणू नका. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात लाभ होईल. थोरामोठय़ांच्या मदतीने कामे करून घेता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नवे डावपेच शिकाल.

शुभ दिनांक ः 9, 10

तूळसहनशीलता राखा

तुळेच्या भाग्येषात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. संयम, सहनशीलता ठेवूनच यश खेचून आणावे लागेल. मत प्रदर्शन करण्याची गरज नाही. भावनेच्या आहारी जाऊ नका. मनस्ताप होईल. नोकरी टिकवा. अधिक कामाची तयारी ठेवा. धंद्यात सावध रहा. राजकीय ,सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत होईल.

शुभ दिनांक ः 12, 13

वृश्चिकप्रकृतीची काळजी घ्या

वृश्चिकेच्या अष्टमेषात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, गुरू त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो समतोल राखण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीची काळजी घ्या. कायदा पाळा. भावनेच्या आहारी जाऊ नका. नोकरीत क्षुल्लक तणाव जाणवेल. सौम्य धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे. ध्येयावर लक्ष ठेवा.

शुभ दिनांक ः 10, 11

धनुचौफेर नजर ठेवा

धनुच्या सप्तमेषात शुक्र, बुध,  सूर्य. चंद्र, शनि प्रतियुती. तटस्थपणे परिस्थितीचा अभ्यास करा. निर्णयाची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची घाई करू नका. नोकरी टिकवा. तडजोड करावी लागेल. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर चौफेर नजर ठेवा. दगाफटका केव्हा, कुणी करेल याचा अंदाज येणे कठीण.

शुभ दिनांक ः 14, 15

मकरकामात बदल घडेल

मकरेच्या षष्ठेशात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, गुरू लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. तडजोड, तारतम्य ठेवा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. कायदा पाळा. नोकरीत, कामात बदल संभवतो. धंद्यात अतिघाई, मोह नको. फसगत टाळता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतच्या फायद्यासाठी मोठेपणा देण्याची तयारी ठेवा.

शुभ दिनांक ः 10, 11

कुंभअस्थिरता नकोशी वाटेल

कुंभेच्या पंचमेषात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, शनि प्रतियुती. शारीरिक, मानसिक तणाव राहील. धावपळ, दगदग नकोशी वाटेल. नोकरीत गैरसमज, व्याप होतील. धंद्यात तारतम्य ठेवा. फसगत, नुकसान टाळता येईल. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अस्थिरता नकोशी वाटेल. मनातील विचार उघड करताना योग्य व्यक्ती निवडा.

शुभ दिनांक ः 12, 13

मीनदगदग होईल

मीनेच्या सुखस्थानात शुक्र, बुध, सूर्य. चंद्र, गुरू त्रिकोणयोग. साडेसाती सुरू आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय सप्ताहाच्या सुरूवातीला घ्या. नातलग, मित्र यांच्यात गैरसमज होतील परंतु मार्गही मिळेल. अनाठायी खर्च टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. सतर्क रहा. नोकरीत दगदग होईल. राजकीय, समाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव राहील.

शुभ दिनांक ः 10, 11