जगभरातून थोडक्यात बातम्या

साईचरणी 648 ग्रॅम सोन्याचा मुकुट अर्पण
शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात. साईंच्या घरी दागिने, पैसे दान करतात. नुकताच एका भक्ताने साईंच्या चरणी 648 ग्रॅम वजनाचा सुवर्णमुकुट दान केला आहे. मुकुटाची किंमत अंदाजे 42 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. पूर्णपणे सोन्याचा मुलामा असलेल्या या मुकुटावर सुंदर, नाजूक असे नक्षीकाम आहे. या दानशूर साईभक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. नित्यनेमाने साईबाबांची आरती होते. त्यानुसार आज सकाळी साईबाबांच्या मूर्तीला हा मुकुट चढवण्यात आला.

सुनीता विल्यम्स 22 जूनपर्यंत अंतराळातच
हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतणे 22 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. दोन अंतराळवीरांचे पतरणे पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. 5 जून रोजी रात्री 8 वाजून 22 मिनिटांनी बोइंगचे स्टारलाइनर मिशन लाँच झाले. फ्लोरिडातील केप कनावेरल स्पेस पर्ह्स स्टेशनवरून यूएलच्या अॅटलस व्ही रॉकेटवर हे प्रक्षेपित करण्यात आले. अंतराळयान दुसऱया दिवशी म्हणजेच 6 जून रोजी रात्री 11 वाजून 3 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पोहोचले. रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी हे यान पोहोचणार होते, परंतु रिअॅक्शन पंट्रोल थ्रस्टरमध्ये अडचण आली होती.

टीसीएस, इन्पहसिस ‘टॉप 100’ ब्रॅण्डमध्ये
आयटी क्षेत्रातील मोठय़ा पंपन्या टाटा कन्सल्टंसी सर्विसेस (टीसीएस) आणि इन्पहसिस यांनी टॉप 100 मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅण्ड्समध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत टेक जायंट पंपनी ‘एअरटेल’ने जागा पटकावली आहे. पंतार ब्रॅण्डझेडने आपली 2024 ची यादी जाहीर केली. या यादीत जगातल्या टॉपच्या व्हॅल्युएबल ब्रॅण्डची नावे आहेत. यादीत टीसीएसने 46 वे स्थान पटकावले आहे, तर एअरटेल आणि इन्पहसिस अनुक्रमे 73 आणि 74 व्या स्थानावर आहेत. यादीत एचडीएफसी बँक 47 व्या क्रमांकावर आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन कंपन्या टॉप 5 मध्ये आहेत. यादीतील 10 पैकी 8 जागा या टेक्नॉलॉजी पंपन्यांनी पटकावल्या आहेत.

बाप रे बाप…. तब्बल 165 मुलांचा बाप
एका 48 वर्षीय व्यक्तीला तब्बल 165 मुले आहेत असे म्हटले तर तुम्ही विश्वास ठेवाल…? असे घडले आहे. ‘विकी डोनर’ हा सिनेमा अनेकांना आठवत असेल. असा विकी डोनर अमेरिकेत सापडला आहे. अमेरिकेतील ब्रुकलिन येथे राहणाऱया 48 वर्षीय एरी नागेलची जगभरात 165 मुले आहेत. नागेल हे व्यवसायाने गणिताचे प्राध्यापक असून ते शुक्राणू दाता म्हणून काम करतात. आतापर्यंत त्यांनी अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिकेसह जगाच्या कानाकोपऱयातील महिलांना शुक्राणू दान केले आहेत. त्यामुळे त्यांना ‘स्पर्मिनेटर’ हा किताबही बहाल करण्यात आला आहे. 50 वर्षांचा होईन तेव्हा शुक्राणू दान करणे बंद करणार असल्याचे नागेलने म्हटले आहे. वयाच्या 50 वर्षी शुक्राणू दान केल्याने ऑटिझमसारख्या गंभीर मानसिक आजाराचा धोका संभवतो असे कारण त्याने दिले आहे.

बिहारमध्ये गंगेत बोट उलटून 6 बेपत्ता
बिहारच्या बाढ परिसरात गंगा नदीत बोट पलटी झाल्याने घडलेल्या दुर्घटनेत 6 भाविक बेपत्ता झाले तर 11 भाविकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. गंगा दशहरा निमित्त सकाळी सव्वानऊच्या सुमारास उमानाथ गंगा घाटजवळ नदीतून 17 भाविकांना घेऊन बोट जात होती. नदीत मधोमध गेल्यानंतर भाविकांच्या वजनाने अचानक बोट पलटी झाली. काही भाविकांनी पोहून नदीचा किनारा गाठला. मात्र, सहा भाविक बेपत्ता झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांचे पथक मदतकार्यासाठी उमानाथ गंगा घाटजवळ जमले. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरुच होते. गंगा दहशरा या सणानिमित्त मोठया संख्येने भाविक गंगा नदीत स्नान करण्यासाठी आले होते. राज्याच्या शीघ्र कृती दलाचे पथकही बचावकार्यासाठी नदी किनारी हजर झाले.

आइस्क्रीममध्ये सापडली मेलेली गोम
मुंबईत आइस्क्रीममध्ये माणसाच्या बोटाचा तुकटा सापडल्यानंतर एकच खळबळ माजली. या घटनेला आठवडा उलटला नाही तोच, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका महिलेने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आइस्क्रीम बॉक्समध्ये गोम आढळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नोएडातील दीपा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ‘ब्लिंकिट’च्या माध्यमातून अमूल आइस्क्रीमचा बॉक्स मागवला होता. त्यांनी आइस्क्रीम पॅक उघडला तेव्हा तिला आत मृत गोम दिसली. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ करून एक्सवर शेअर केला. आइस्क्रीमची पॅकेजिंग डेट 15 एप्रिल 2024 होती आणि एक्सपायरी डेट 15 एप्रिल 2025 होती.

दीपा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तत्काळ ‘ब्लिंकिट’शी संपर्क साधला. त्यानंतर ‘ब्लिंकिट’ने दिलगिरी व्यक्त करत त्यांची रक्कम परत केली. या घटनेबाबत अमूलचा प्रतिनिधी संपर्क साधेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दीपा यांनी तक्रार दिलेली नाही. नोएडचे अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय गोयल यांनी दिपायांच्या सोशल मीडियावरील पोस्टची गंभीर दखल घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आइस्क्रीम पंपनी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि जिथून आइस्क्रीम मागवले तिथला स्टोअर मॅनेजर यांच्या विरोधात गुन्हा
नोंदवला आहे.

हजारो कासवे समुद्राला मिळाली
समुद्री कासवांच्या विणीचा हंगाम संपल्यानंतर आता तामीळनाडूच्या विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टीवरून हजारो समुद्री कासवांची पिल्ले बंगालच्या उपसागरात परतली आहेत. तामीळनाडूला 1,076 किमीचा सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे. विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल्स, हॉक्सबिल, लॉगरहेड आणि लेदरबॅक कासवांसह अनेक प्रजातींची समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी या किनाऱयांवर येत असतात.

राफातील दिवसाचे हल्ले थांबवले
गाझापट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांपर्यंत मानतावादी मदत विनाअडथळे पोहोचावी यासाठी द. गाझा भागातील एका मार्गावरील दिवसाचे हल्ले सकाळी 8 ते संध्या. 7 या वेळेसाठी थांबवण्याची घोषणा इस्रायलच्या सैन्याने केली आहे. यामुळे मदतीचे ट्रक या मार्गावरून जवळच्या इस्रायल-नियंत्रित केरेम शालोम क्रॉसिंगवर पोहोचू शकतात. या मार्गामुळे खान युनिस, मुवासी आणि इतर भागांमध्ये मदतीचा ओघ वाढेल.

दोन सिमकार्ड वापरल्यास दंड नाही!
एका मोबाईल पह्नमध्ये दोन सिमकार्ड वापरणाऱयांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार, असा दावा नुकताच एका अहवालातून करण्यात आला होता. त्यामुळे दोन सिमकार्ड वापरणाऱयांची चिंता वाढली होती, मात्र या दाव्यात काही तथ्य नसल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केलंय. दूरसंचार विभागाने म्हटलंय की, एकापेक्षा जास्त सिम आणि नंबरसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्याची ट्रायची योजना नाही.

हिंदुस्थानचा अमेरिकेत युद्धसराव
इंडियन एअरपर्ह्सने अमेरिकेच्या अलास्कात झालेल्या रेड प्लॅग 2024 या युद्धसरावात भाग घेतला. अलास्काच्या इलसन हवाई तळावर 4 ते 14 जूनपर्यंत हा युद्धसराव चालला. हिंदुस्थान आणि अमेरिकेशिवाय सिंगापूर, ब्रिटन, नेदरलॅण्ड आणि जर्मनीच्या हवाई दलांनीही युद्धसरावात सहभाग नोंदवला हिंदुस्थानी हवाई दलाच्या पथकात राफेल फायटर जेट, एयर क्रूसह तंत्रज्ञ, अभियंते सहभागी झाले.