राजकुमार रावचा ‘स्त्री 2’चा टीझर झाला आउट!

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2′ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा शुक्रवारी टिझर रिलीज झाला आहे. स्त्री 2’ मध्ये सर्वाधिक पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार राव पुन्हा विकीच्या भूमिकेत दिसणार असून त्याचे चाहते यासाठी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, मॅडॉक फिल्म्सच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्या’ सोबत थेट थिएटरमध्ये हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.राजकुमार रावचा या वर्षातील हा तिसरा सिनेमा आहे आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियांनुसार हा सिनेमा 2024 राजकुमार रावचा ब्लॉकबस्टर ठरणार आहे.

राजकुमार राव ‘श्रीकांत’ सिनेमात दृष्टिहीन उद्योगपती श्रीकांत बोल्लाच्या भूमिकेत दिसला होता ज्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती, तर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मध्ये तो क्रिकेटर-कोचच्या भूमिकेत दिसला होता. ‘स्त्री’ नंतर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा राजकुमार रावचा सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा ठरला आणि आता असे दिसते आहे की ‘स्त्री 2’ पूर्वीचे रेकॉर्ड देखील मोडेल. पण इथेच न थांबता राजकुमार ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्ये अभिनेता तृप्ती दिमरीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याच्या लिस्टमध्ये आणखी काही मनोरंजक प्रोजेक्ट आहेत ज्यांची तो लवकरच घोषणा करेल!