व्यापार गुपितांच्या कथित गैरवापराच्या आरोपांवरून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तथा टीसीएसला अमेरिकेतील एका जिल्हा न्यायालयाने 194.2 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे. डीएक्ससी टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये विलीन झालेल्या कॉम्प्युटर सायन्सेस कॉर्पोरेशनने (CSC) दाखल केलेल्या खटल्यात हा आदेश देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशाविरोधात टीसीएस अपील करणार आहे.
सेबीला टीसीएसने या आदेशाची माहिती दिली. आदेशाविरुद्ध अपील करणार आणि फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचे या तपशीलात म्हटले आहे. टेक्सासच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट, डॅलस विभागीय कोर्टाने हा निर्णय दिल्याचे कंपनीने कळवले आहे.