साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 16 जून ते शनिवार 22 जून 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – कोणताही वाद मोठा शकतो
सूर्य चंद्र त्रिकोणयोग. बुध, शुक्र युती. उत्साह, आत्मविश्वास वाढवणाऱया घटना. प्रकृतीची काळजी घ्या. कोणताही वाद मोठा होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. यश मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जुन्या अनुभवांचा उपयोग नव्या पद्धतीने करावा लागेल. कठीण कामे करून घ्या.
शुभ दिनांक – 17, 18

वृषभ – प्रवासात घाई नको
सूर्य, बुध युती. चंद्र, शुक्र लाभयोग. वारंवार राग वाढवण्याचा प्रयत्न होईल. संयम ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई नको. नोकरीत व्याप वाढला तरी वर्चस्व राहील. धंद्यात दगदग, धावपळ वाढेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना आपलेसे करणे सोपे नाही. गुप्त कारवाया, डावपेच यांचा खेळ नकोसा होईल.
शुभ दिनांक – 16, 20

मिथुन – तणाव दूर होईल
बुध, शुक्र युती, सूर्य, नेपच्युन केंद्रयोग. प्रत्येक दिवस यश खेचून आणणारा आहे. योग्य निर्णय घेऊन कठीण समस्या लवकर सोडवा. नोकरीच्या ठिकाणी प्रभाव राहील. आपापसांतील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंद्यातील तणाव दूर होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना मदत करावी लागेल. कौटुंबिक तणाव कमी करता येईल.
शुभ दिनांक – 16, 17

कर्क – महत्त्वाची कामे करा
शुक्र, प्लुटो ष्डाष्टक योग, चंद्र, गुरू प्रतियुती. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. अचानक काही गोष्टींमुळे मनस्वास्थ्य बिघडू शकते. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक होण्याची शक्यता. व्यसन, मोहापासून दूर रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात असहाय्यतेची जाणीव होईल. नवीन परिचयाची नीट चाचपणी करा.
शुभ दिनांक – 16, 20

सिंह – प्रश्नांची उकल होईल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, शुक्र युती. क्षुल्लक तणाव, गैरसमज सप्ताहाच्या सुरूवातीला जाणवेल. अनेक प्रश्नांची उकल होईल. सहकार्य वाढेल. नोकरीत प्रभाव राहील. कामाचे कौतुक होईल. धंद्यात परिश्रमांना यश लाभेल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच रचता येतील. दिग्गज व्यक्तींच्या सहवासाने ज्ञानात भर पडेल.
शुभ दिनांक – 17, 18

कन्या – रागावर ताबा ठेवा
बुध, शुक्र युती, चंद्र, गुरू प्रतियुती. बऱयाच अवधीनंतर उत्साह, आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल. प्रवासात घाई नको. रागावर ताबा ठेवा. नोकरीत वर्चस्व वाढेल. लाभ होईल. धंद्यात निर्धार करून जम बसेल. कर्जाचे काम करता येईल. कोर्टकचेरीच्या कामात दिलासा देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्री करण्यास येतील.
शुभ दिनांक – 18, 19

तूळ – सावधपणे बोला
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, शुक्र युती. आत्मविश्वासाने, मेहनतीने यश खेचता येईल. सोपी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात अवघड वाटेल. मदत करणाऱया व्यक्ती पाठ फिरवण्याची शक्यता. नोकरीत सावधपणे बोला. धंद्यात नम्रता बाळगा. सतर्क रहा. राजकीय, सामाजिक भावनेद्वारे तुमचे गुपित काढून घेण्याचा प्रयत्न होईल. तारतम्य ठेवा.
शुभ दिनांक – 19, 20

वृश्चिक – अहंकार दूर ठेवा
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, गुरू प्रतियुती. गुप्त कारवायांना रोखणे सोपे नाही. तरीही प्रयत्नांनी अडचणींवर मात करू शकाल. अहंकार नको. संयम व मधुर वाणी यावर यश अवलंबून राहील. धंद्यात अतिरेक, राग याने नुकसान होण्याची शक्यता. नोकरीत दबाव रहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपयशाचे खापर तुमच्यावर फोडले जाईल.
शुभ दिनांक – 20, 21

धनु – कामाचा व्याप राहील
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, शुक्र युती. जुळत आलेले एखादे काम फिसकटण्याची शक्यता. धावपळ, दगदग होईल. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. दडपण, दबाव, गैरसमज जाणवेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. कामाचा व्याप राहील. धंद्यात सावध रहा. नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर तारेवरची कसरत करावी लागेल.
शुभ दिनांक – 17, 18

मकर – किरकोळ वाद होतील
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, गुरू प्रतियुती. कोणताही निर्णय घेण्याची घाई नको. दबाव, आग्रह, मैत्री याच्या जाळ्यात अडकल्यासारखे वाटेल. तात्पुरती अडचणी आहेत वाट पहा. नोकरी टिकवा. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. धंद्यात किरकोळ वाद होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या व्यक्ती प्रश्नांवर चर्चा करण्यात येतील.
शुभ दिनांक – 16, 17

कुंभ – खरेदी विक्रीत लाभ
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, शुक्र युती. महत्त्वाची कठीण कामे करून घ्या. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. धंद्यात जम बसेल. खरेदाöfिवक्रीत फायदा होईल. योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक साहाय्य मिळवा. कोर्टाच्या कामात दिलासा मिळेल. कौटुंबिक कामे होतील. गैरसमज दूर कराल. लोकसंग्रह, प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दिनांक – 18, 19

मीन – गैरसमज होतील
बुध, शुक्र युती, बुध, मंगळ लाभयोग. प्रवासात घाई नको. रागावर ताबा ठेवा. अनेक कामे करून घेता येतील. नवीन परिचय उत्साह व प्रेरणा देणारा ठरेल. नोकरीत क्षुल्लक गैरसमज होतील. धंद्यात पैसा जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रश्न सोडवणे किचकट ठरेल. मनावर दडपण राहील. वरिष्ठांची मर्जी पाहून तुमच्या मनातील गोष्टी उघड करा.
शुभ दिनांक – 16, 20