साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 26 मे ते शनिवार 1 जून 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रकृतीची काळजी घ्या

स्वराशीत मंगळ, वृषभेत बुध, हर्षल. दगदग, धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी कलाटणी देणारी घटना घटना घडेल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत फायदेशीर बदल होतील. धंद्यात दूरदृष्टीकोनातून महत्त्वाचा निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या धाडसाचे गोडवे गायले जातील. कठीण कामे पूर्ण होतील.

शुभ दिनांक : 27, 28

वृषभ – वर्चस्व सिद्ध कराल

स्वराशीत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. वाद वाढवू नका. नोकरीत व्याप वाढेल, पण वर्चस्व सिद्ध कराल. धंद्यात संयम ठेवा. कला, साहित्यात उत्साहवर्धक घटना घडतील. कल्पनाशक्ती वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांना कमी लेखू नका. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. योजनांना अर्थसहाय्य मिळवता येईल. कौटुंबिक कामे होतील.

शुभ दिनांक : 28, 29

मिथुन – सावध भूमिका घ्या

वृषभेत बुध, हर्षल, मेषेत मंगळ. नुसत्या आत्मविश्वासाने वागून कामे होत नाहीत. प्रत्येक ठिकाणी सावध भूमिका घ्या. कायदा पाळा. वस्तू सांभाळा. जवळच्या व्यक्ती घातक ठरू शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत चिंता राहील. सहकारी दगा देतील. धंद्यात नुकसान टाळता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडतील.

शुभ दिनांक : 26, 31

कर्क – अहंकार दूर ठेवा

वृषभेत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. अडचणीतून मार्ग काढत कामे करावी लागतील. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळवता येईल. जुना वाद मिटवून नव्या विचाराने पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरीत धावपळ होईल. तणाव, अहंकार ठेवू नका. परिचयात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामे वाढतील. प्रतिष्ठा, जनसंग्रह वाढवता येईल.

शुभ दिनांक : 28, 1

सिंह – प्रगती कराल

वृषभेत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. अनेक कोडी उलगडतील. नव्या दिशेने, प्रगतीच्या मार्गाने जाण्याचे ठरवाल. दिग्गज लोकांचा सहवास लाभेल. ज्ञानात भर पडेल. कला, क्रिडा, साहित्यात प्रगती कराल. नोकरीधंद्यात बढती होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, पद मिळाल्याने कामांना पुढे न्याल.

शुभ दिनांक : 26, 31

कन्या

रागावर नियंत्रण ठेवा

वृषभेत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. दौऱ्यात, प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत फायदेशीर घटना घडतील. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. धंद्यात नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा लाभेल. लोकप्रियता वाढेल. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. वेगळी कलाटणी मिळाल्याने अस्वस्थ व्हाल.

शुभ दिनांक : 28, 29

तूळ – चौफेर दबाव राहील

वृषभेत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. मानसिक, शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. चौफेर दबाव राहील. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. कायदा, सुव्यवस्थेचे सर्वत्र भान ठेवा. नोकरीत राजकारण खेळले जाईल. धंद्यात सतर्क रहा. हिशेब पुन्हा तपासा. मोह, व्यसनाने नुकसान होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात घात करण्याचा प्रयत्न होईल.

शुभ दिनांक : 26, 30

वृश्चिक – नवे धोरण फायदेशीर

वृषभेत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. परस्पर विरोधी घटना घडण्याची शक्यता. विरोधक गुप्त कारवाया करून कमी लेखण्याचा प्रयत्न करतील. संतापाने समस्या वाढतात. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात नवे धोरण फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टीतून नवे डावपेच टाकून वर्चस्व वाढवता येईल.

शुभ दिनांक : 26, 28

धनु – गाफील राहू नका

वृषभेत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. विश्वासातील व्यक्ती फितूर होण्याची शक्यता. क्षेत्र कोणतेही असो, गाफील राहू नका. मैत्रीत, नात्यात गैरसमज, तणाव राहील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी टिकवणे कठीण राहील. धंद्यात फसगत होईल. नुकसान टाळण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिद्द, बुद्धिचातुर्य, दूरदृष्टी यावर यश खेचावे लागेल.

शुभ दिनांक : 28, 29

मकर – सहकार्य लाभेल

वृषभेत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. सोमवारपासून कामे सुरळीत पार पाडता येतील. दौऱ्यात, प्रवासात सावध रहा. धोका पत्करू नका. धंद्यात वाढ होईल. नवे परिचय उपयुक्त ठरतील. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक कोडी उलगडतील. जवळच्या व्यक्तीचा उपयोग होईल. लोकप्रियता, प्रतिष्ठा वाढेल. घरगुती कामे होतील.

शुभ दिनांक : 28, 29

कुंभ – चातुर्य वापरा

वृषभेत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. अतिउत्साह, आत्मविश्वास यामुळे समस्या वाढतील. साडेसाती सुरू आहे. नोकरीत सतर्क रहा. चुका टाळा. धंद्यात भागीदार खेळी खेळेल. चातुर्य वापरा. वसुली कठीण वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. कायद्याला धरून संभाषण करा. गैरसमज वाढेल. प्रतिष्ठा, लोकप्रियता जपा.

शुभ दिनांक : 26, 30

मीन – उतावळेपणा नको

वृषभेत बुध, हर्षल. मेषेत मंगळ. पैशांची काळजी घ्या. धंद्यात खर्च निर्माण होईल. नवे काम मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे घटना घडतील. साडेसाती सुरू आहे. उतावळेपणा करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. महत्त्वाचे मुद्दे मांडाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. स्पर्धेत प्रगती होईल. खरेदी-विक्री, कला-साहित्यात प्रेरणा मिळेल.

शुभ दिनांक : 27, 28