बांगलादेशी खासदाराच्या मृतदेहाचे तुकडे करून विविध ठिकाणी फेकले

बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येप्रकरणी नवा आणि अंगावर काटा आणणारा खुलासा समोर आला आहे. त्यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराची कातडी काढण्यात आली होती. तसेच  मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यांमध्ये भरून शहरातील विविध भागात फेकण्यात आले. या प्रकरणात कोलकात्यातील न्यू टाऊन भागात असलेल्या एका अपार्टमेंट फ्लॅटच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सीसीटीव्हीत दोन आरोपी प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि सुटकेस घेऊन जाताना दिसत आहेत. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. खासदार अन्वारुल यांना ज्या फ्लॅटमध्ये शेवटचे पाहिले होते त्याच फ्लॅटवर 22 मे रोजी तपासासाठी पोलीस पोहोचले होते. तेथे त्यांना रक्ताचे डागही आढळले होते.  याप्रकरणी शिलास्ती रहमान या बांगलादेशी महिलेला बांगलादेशी पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी सध्या सुरू आहे.