जनतेचे प्रश्न म्हणजे राजकारण आहे काय?

anil-deshmukh

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी आज एक्सवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. खासदार राहुल गांधी पुण्यातील दुर्दैवी घटनेवर बोलले तर फडणवीस म्हणतात, या घटनेचे राजकारण करणे राहुलजींना शोभत नाही. पवार साहेब महाराष्ट्रातील दुष्काळावर बोलले तर फडणवीस म्हणतात, दुष्काळाचे राजकारण करणे पवार साहेबांना शोभत नाही. अर्थात फडणवीस यांच्या मते जनतेचे प्रश्न मांडणे म्हणजे निक्वळ राजकारण करणे आहे काय? असा खरमरीत सवाल अनिल देशमुख यांनी विचारला.