सोशल मीडिया मुलांसाठी धोकादायक

मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सचा मालक आणि टेस्ला कंपनीचा सर्वेसर्वा असलेल्या एलन मस्क यांनी जगभरातील पालकांसाठी मोलाचा मंत्र दिला आहे. सोशल मीडिया हा मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणे आवश्यक आहे, असे मस्क यांनी सांगितले आहे. सोशल मीडियाचा वारंवार वापर करणे छोटय़ा मुलांसाठी चांगले नाही. यावर मर्यादा आणणे गरजेचे आहे, असेही मस्क यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत मस्क यांनी सोशल मीडियासंबंधी बोलताना पालकांना हा मोलाचा संदेश दिला आहे. मी सर्व पालकांना विनंती करतो की, आपापल्या मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवा. मुले एआय अल्गोरिदमबद्दल संवेदनशील असतात. जे डोपामाइन स्तरला जास्तीत जास्त करून युजर्सला जोडण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत. एलन मस्क यांनी या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओसुद्धा एक्सवर शेअर केला आहे.