सावध राहा! 47 टक्के हिंदुस्थानींना हातोहात फसवले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 166 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मागील तीन आर्थिक वर्षात 47 टक्के हिंदुस्थानी नागरिकांनी एक वा त्यापेक्षा अधिक आर्थिक फसवणुकीचा सामना केला आहे. आरबीआयने जारी केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार यूपीआय आणि क्रेडिट कार्डशी संबंधित फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे.

सर्वेक्षण एजन्सी लोकल सर्कल्सने 302 जिह्यांतील 23 हजार लोकांचे सर्व्हेक्षण केले. यात निम्म्याहून अधिक लोकांना क्रेडिट कार्डवर स्थानिक, आंतरराष्ट्रीय व्यापारी, वेबसाईटद्वारे अनधिकृत शुल्क लावण्यात आले. 43 टक्के लोकांनी क्रेडिट कार्डवर फसव्या व्यवहारांची नोंद केली, तर 36 टक्के लोकांनी युपीआय व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे सांगितले. 2023-24 या आर्थिक वर्षात फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 166 टक्क्यांनी वाढ होऊन 36,000 हून अधिक झाली आहे. तथापि, त्यांचे मूल्य 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्मे (रु. 13,930 कोटी) आहे.