दिल्लीत पाण्यावरून आप व भाजप आमनेसामने; हरयाणातील भाजप सरकारचा पाणी सोडण्यास नकार

ruckus between AAP, BJP MLCs

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह अनेकांना भाजपने केंद्रीय यंत्रणाचा वापर करून अटक केली आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेपूर्वी आप सरकारला बदनाम करण्यासाठी आता पाण्याच्या मुद्यांवरून दिल्लीत आप व भाजप आमनेसामने आले होते. यावेळी भाजपने मटका फोड आंदोलन करत दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप आपने व्हिडिओ टाकत आरोप केला. दिल्लीशेजारील भाजपची सत्ता असलेल्या हरयाणा राज्याने पाणी सोडण्यास नकार दिल्याने पाणीटंचाई जाणवत आहे.

रविवारी छत्रपूर येथील दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. आपनेही एक व्हिडिओ व्हायरल केला ज्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते कार्यालयात तोडफोड करत आहेत. भाजपचा गमछा गळ्यात असलेले कार्यकर्ते या व्हिडिओत दिसत आहेत. हे पाहा, भाजपचे कार्यकर्ते कशापद्धतीने दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयाची तोडफोड करत आहेत. तसेच भाजप झिंदाबाद अशा घोषणा देत आहेत. एका बाजूला हरयाणातील भाजपा सरकार दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडत नाही. तर दुसर्‍या बाजूला दिल्लीतील भाजप कार्यकर्ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत.

दिल्लीतील द्वारका जिल्ह्यात पाण्याच्या प्रश्नावरून तणाव निर्माण झाला आहे. सार्वजनिक नळाद्वारे मिळणार्‍या पाण्यावरून काही लोकांच्या वादातून हाणामारी झाल्यामुळे तीन लोक जखमी झाले आहेत. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली पोलिसांना पीसीआरवरून दोन फोन आल्याचे निश्चित करण्यात आले आहे. पाण्याच्या संघर्षाला कोणतेही जातीय वळण नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. दिल्लीच्या जलमंत्री आतिशी सिंह यांनी वाढता संघर्ष लक्षात घेऊन दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहून तोडफोडीपासून पाण्याच्या पाईपलाईनचे संरक्षण करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्याची विनंती केली आहे. दक्षिण दिल्लीत पाण्याच्या पाईपलाईनला जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवले जात आहे, त्यामुळे पाण्याची टंचाई आणखी वाढत आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी दिल्लीत मटका फोड आंदोलन केले होते.