उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱया 25 वर्षीय शिखा मात्रेला पोलिसांनी अटक केली. शिखा मात्रे हिचे कुंवारी बेगम नावाचे यूटय़ुब चॅनेल आहे. या चॅनेलवर तिने छोटय़ा मुलांचा लैंगिक छळ कसा करायचा याचे काही व्हिडीओ अपलोड केले होते. यावरून तिला आता पोलिसांनी अटक केली आहे. शिखा मात्रेच्या यूटय़ुब चॅनेलवर पोर्नोग्राफिक आणि छोटय़ा मुलांच्या लैंगिक छळासाठी प्रोत्साहन दिले जाणारे काही व्हिडीओ शेअर करण्यात आल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. शिखा मात्रेने गुह्याची कबुली दिली. पोर्नोग्राफिक व्हिडीओ टाकल्याचे तिने मान्य केले आहे, असे पोलीस अधीक्षक रितेश त्रिपाठी यांनी म्हटले आहे. शिखाने पुंवारी बेगम नावाच्या चॅनेलवरून लैंगिक व्हिडीओ शेअर करायची. याच नावाने तिचे इंस्टाग्राम अकाऊंटसुद्धा आहे. तिच्या यूटय़ुब चॅनेलला दोन हजारांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. आतापर्यंत तिने 115 व्हिडीओ अपलोड केले आहेत.