सिक्कीममधील भूस्खलनात 9 बळी

सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाराशेहून अधिक पर्यटक सध्या सिक्किममध्ये अडकले आहेत. उत्तर सिक्कीममधील मंगन  जिह्यात संततधार पाऊस पडत असून पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 15 विदेशी नागरिकांसह बाराशेहून अधिक पर्यटक अडकले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत रस्ते मार्ग, वीज, मोबाईल नेटवर्कचे मोठे नुकसान झाले आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मिंटोकगांग येथे अधिकाऱयांची एक उच्चस्तरीय बैठक बोलाविली असून या बैठकीत पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहेत.