ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने शुक्रवारी ऑडी क्यू3 बोल्ड एडिशन आणि ऑडी क्यू3 स्पोर्टबॅक बोल्ड एडिशनच्या लाँचची घोषणा केली. बोल्ड एडिशन व्हर्जन्समध्ये विशिष्ट स्टायलिंगची भर करण्यात आली आहे आणि त्यांची विशिष्टता व अद्वितीय डिझाइन ऑडीप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
ऑडी क्यू३ बोल्ड एडिशनची एक्स,शोरूम किंमत 54,65,000 रूपये आणि ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक बोल्ड एडिशनची एक्स,शोरूम किंमत 55,71,000 रूपये आहे. ब्लॅक स्टायलिंग पॅकेजमध्ये आकर्षक ब्लॅक डिझाइन आहे, तसेच यामध्ये ग्लॉस,ब्लॅक ग्रिल, पुढील व मागील बाजूस ब्लॅक ऑडी रिंग्ज, ब्लॅक विंडो सराऊंड्स, ब्लॅक ओआरव्हीएम आणि ब्लॅक रूफ रेल्स आहेत.
ऑडी क्यू3 आणि क्यू3 स्पोर्टबॅक बोल्ड एडिशनची खास वैशिष्ट्ये आहेत, दर्जेदार कार्यक्षमता: 2.0 लीटर टीएफएसआय इंजिनसह लीजेण्डरी क्वॉट्रो ऑल,व्हील ड्राइव्ह, 190 एचपी शक्ती आणि 320 एनएम टॉर्कची निर्मिती, 45.72 सेमी (आर18) 5,आर्म स्टाइल अलॉई व्हील्स, 45.72 सेमी (आर18) ५,स्पोक व्ही,स्टाइल (‘एस’ डिझाइन) अलॉई व्हील्स, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ, पॉवर अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर,वे लंबर सपोर्ट,पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा, ऑडी स्मार्टफोन इंटरफेस अशी विविध वैशिष्ट्ये यामध्ये आहेत.