Rafael Nadal : लाल बादशाह पुन्हा एकदा लाल मातीत उतरणार

इटालियन ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर लाल बादशाह राफाएल नदाल रोलॅण्ड गॅरोसच्या लाल मातीत खेळायचे की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत होता. पण अखेर त्याने आपण खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे फ्रेंच ओपनच्या सलामीच्या सामन्यात त्याची सलामीची लढत अॅलेक्झांडर झ्वेरेवशी होईल.

22 ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या नदालने आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम लाल मातीतच जिंकली आहेत. त्याने आतापर्यंत विक्रमी 14 फ्रेंच ओपन किताब पटकावले आहेत. गेले काही महिने तो दुखापतीमुळे टेनिस कोर्टपासून दूरच होता. आता त्याने पुनरागमन करण्याचे ठरविले असले तरी त्याला सलामीलाच झ्वेरेवशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. 2022 साली झ्वेरेवशी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत खेळला होता. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या झ्वेरेवचा अडथळा पार करून दुसरी फेरी गाठणे नदालसाठी नक्कीच आव्हानात्मक असेल. गेल्या वर्षी दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमधून त्याने माघार घेतली होती. या वर्षी त्याने इटालियन ओपनमधून टेनिसमध्ये पुनरागमन केले, पण या स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर फ्रेंच ओपनबाबत त्याच्या मनाता साशंकता होती.