गुगल मॅपमुळे कार थेट नदीत बुडाली

प्रवासात गुगल मॅपने सांगितलेल्या रस्त्याने जाणे एका प्रवाशाला चांगलेच भोवले. गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कार थेट नदीत बुडाली. ही घटना केरळच्या कुरुप्पन थारा येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. शुक्रवारी मध्यरात्री हैदराबादहून आलेले हे पर्यटक कारने अलप्पुझाकडे जात होते. गाडी चालवणाऱ्या चालकाला रस्ता माहिती नव्हता. तो गुगल मॅपच्या भरवशावर गाडी चालवत होता, परंतु गुगल मॅपने रस्ता चुकवल्याने कार थेट नदीत बुडाली. या कारमध्ये एका महिलेसह चार जण होते. सुदैवाने हे चार जण बचावले, परंतु कार नदीत बुडाली.