Photo – कान्सच्या रेड कार्पेटवर बिब्बोजान चमकली, इंस्टाग्रामवर शेअर केले मोहक फोटो

अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’मध्ये मध्ये तिने साकारलेली ‘बिब्बोजान’ भूमिका लक्षवेधक ठरली आहे. आता तिचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील आकर्षक लूकची चर्चा सुरु आहे. यावेळी ती काळ्या-पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. काळ्या रंगाच्या वेल्वेटने तयार केलेला अदितीचा स्ट्रेपलेस गाऊन एका पांढऱ्या रंगाच्या शायनी स्कर्टला जोडलेला दिसत आहे. मोनोक्रोम आऊटफिटनध्ये तिचे सौंदर्य आणखी खुललेले दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.