अजित पवारांना हातपाय बांधून पळायला लावलेय; रवींद्र धंगेकर यांची टीका

कल्याणीनगरमधील हिट अँड रन प्रकरणामध्ये शासनाच्या प्रक्रियेमध्ये अजित पवार यांना किती घेतले जाते आणि त्यांचे किती ऐकले जाते हा महत्त्वाचा भाग आहे. या प्रकरणामध्ये अजित पवार यांना कोणता रोल द्यायचा हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे अजित पवार हे प्रचंड अस्वस्थ असून ‘त्यांचे हात पाय बांधून त्यांना पळायला लावले आहे, पण ते पळू शकत नसून देवेंद्र फडणवीस यांनीच हा निर्णय घेतला असल्याची टीका आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणावरून राजकारण तापलेले आहे. दररोज नवनवीन आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे पाहयला मिळत आहे. काल पुणे दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता धंगेकर यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिले.