लातूर, धाराशिव लोकसभा, मतदारसंघात आज मतदान

 

 

लातूर, धाराशिव लोकसभा, मतदारसंघात आज मतदा  उष्णतेच्या प्रचंड लाटेत लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यातील मतदान मंगळवारी होत आहे. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश असून, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर येथेही मतदान होणार आहे. लातूर येथे २८ तर धाराशिवमध्ये ३१ उमेदवार िंरगणात आहेत.

 

 

लातूर लोकसभा मतदारसंघात १९.७७ लाख मतदार असून, २१२५ केंद्रांवर ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल १६,७६५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. ७८९ मतदान केंद्रांवर मतदारांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी मंडप टाकण्यात आला आहे. १०६२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असून, मतदानासाठी ४२५० बॅलेट युनिट तर २१२५ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

 

 

धाराशिव मतदारसंघात २०.४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २१३९ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी उन्हात रांगा लागणार आहेत त्या मतदान केंद्रावर मंडप टाकून सावलीची सोय करण्यात आली आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींना मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथक

 

मराठवाड्यात सध्या उष्णतेची जबर लाट असून, पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. मतदारास उन्हाचा त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात येणार आहे.

धाराशिव आणि लातुरात मतदान निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील मतदारसंघाबाहेर पोलिसांचे विशेष पथक तैनात ठेवण्यात येणार आहे

मतदानाच्या तिसर्‍या पट्ट्यात १० राज्यांतील ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात ९५ मतदारसंघात निवडणूक होणार होती. मात्र सुरत येथे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करून भाजपने रडीचा डाव खेळला. जम्मू-कश्मिरातील अनंतनाग-राजौरी मतदारसंघातील निवडणूक खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात केंद्रीय मंत्री अमित शहा, मनसुख मांडविय, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, एस. पी. सिंह, श्रीपाद नाईक, प्रल्हाद जोशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवराज सिंह चौहान, दिग्विजय सिंह, बसवराज बोम्मई आणि जगदीश शेट्टार हे चार माजी मुख्यमंत्रीही या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. तिसर्‍या टप्प्यात एकुण १३५२ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी ३९२ उमेदवार कोट््यधीश आहेत तर पाच उमेदवारांकडे मालमत्ताच नाही.