शाई लावलेलं बोट दाखवा डिस्काउंट मिळवा! मतदारांसाठी जबरदस्त ऑफर

राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा सोमवारी म्हणजेच 20 मे रोजी पार पडणार आहे. सोमवारी 13 मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरीता अनेक संस्था सवलती देत असतात. आता मतदारांनी शाई लावलेलं त्यांच बोट दाखवलं तर त्यांना स्विगी डाईन आऊटवर 50 टक्क्यांची सूट मिळणार आहे.

नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा हा या मागचा उद्देश आहे. स्विगी डाइन आऊटने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. येत्या सोमवारी शहरात मतदान होणार आहे. त्यानिमित्त स्विगीने मोठ्या हॉटेलमध्ये मतदारांना आकर्षक सूट दिली आहे. 20 मे रोजी बोटाला लावलेली शाई दाखवून मुंबईकरांना जेवण्याच्या बिलात 50 टक्क्यांची सूट मिळणार आहे. लुसी लोयू, सॅफ्रॉन अँड सोय, सान्टे स्पा कुझिन, फाऊंटन सिझलर्स, ओशन किचन फाईन डाईन, कोकम भरत एक्सलेंसा, यलो चिली बाय संजीव कपूर आणि फिशरमनस् केव- टेस्ट ऑन प्लेट या हॉटेल्समध्ये ही ऑफर असणार आहे.