मद्यधुंद युवक मोबईल टॉवरवर चढला; गावकऱ्यांनी उतरविले खाली

लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे एक मद्यधुंद युवक मद्यधुंद अवस्थेत गावाजवळच्या मोबाईल टॉवरवर चढला होता. सोमेश्वर मुखरण देशमुख असे मद्यधुंद अवस्थेत मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या युवकाचे नाव आहे. नागरिकांना सोमेश्वर टॉवरवर चढल्याचे समजताच 3 नागरिकांनी टॉवरवर चढून त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमेश्वर मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला खाली उतरविणे कठीण होते. अखेर गावकऱ्यांनी टॉवरवर चढलेल्या मद्यधुंद युवकाला टॉवरवरून सुखरूप खाली उतरविले. मद्यधुंद युवकाला टॉवरवर चढल्याचे पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी झाली होती.