लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात मतदानावेळी पैसे वाटल्याचे आणि मतदारांवर दबाव आणण्यात आल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. याबाबतचे व्हिडीओशी सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ बीडच्या परळी येथील असल्याची चर्चा आहे. या व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांनी भाजपविरोधात संताप व्यक्त केला आहे. आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हीडिओत एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्राजवळ उभे असलेल्या मतदाराला एक व्यक्ती सूचना देताना दिसत आहे. ती व्यक्ती मतदारांना कोणते बटन दाबा, हे सांगताना दिसत आहे. यावर रांगेत उभे असलेले इतर मतदार ज्याचे मतदान त्यांना करु द्या, असे सांगत आहेत. मात्र, तरीही सूचना देणारी व्यक्ती तिथेच उभे राहून मतदारांना सूचना देताना दिसत आहे. यावरुन रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
बीड जिल्ह्यात विशेषता परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे.म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर… pic.twitter.com/MtgzFGwBqn
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 18, 2024
बीड जिल्ह्यात विशेषता परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे?, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.