लग्नसराईला 58 दिवसांचा ’ब्रेक’; विवाहासाठी 29 जूनपर्यंत मुहूर्तच नाहीत

लग्नासाठी मुहूर्त फार महत्त्वाचा आहे. परंतु, यंदा मे आणि जून महिन्यात दोनच मुहूर्त आहेत. त्यामुळे 29 जूनपर्यंत विवाहासाठी मुहूर्तच नाहीत. लग्नसराईला तब्बल 58 दिवसांचा ब्रेक लागला असल्याने विवाह करू इच्छिणाऱया नवरी आणि नवरदेवांवर थांबण्याशिवाय पर्याय नाही. 58 दिवस म्हणजेच जवळपास दोन महिने ब्रेक लागला असल्याने बाजारपेठेतील उलाढालींवरसुद्धा याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एप्रिल, मे  या दोन महिन्यांत मोठी उलाढाल होत असते. विवाहासाठी बाजार पेठामधील दुकाने सजली आहेत. परंतु, मुहूर्त नसल्याने ग्राहक दुकानाकडे फिरकत नाहीत, अशी सध्याच्या स्थिती आहे. विवाहासाठी मुहूर्त महत्त्वाचा असून वधू आणि वर हे दोन्ही मंडळी मुहूर्त कटाक्षाने पाळतात. या वर्षी लग्नसराईची धामधूम आहे. सोयरिक जुळवणे आणि विवाह पार पाडण्यासाठी दोन्ही वर आणि वधू पक्षांकडील मंडळी तयार करण्यासाठी तत्पर असतात, परंतु यंदा वैशाख महिन्यात गुरू आणि शुक्राचा अस्त असल्याचे सांगितले जात असल्यामुळे विवाहाला मुहूर्त मिळत नाही. लग्नसराईत 58 दिवसाचा खंड पडणार आहे. मे ते 29 जूनदरम्यान विवाह मुहूर्त नाही. त्यामुळे दोन महिने बँडबाजा, पंगत, डीजे, हळद आणि लग्नातील सर्वच धम्माल या सर्वांना ब्रेक मिळणार आहे.

विवाहासाठी शुभ मुहूर्त

जुलै       9 ते 17

नोव्हेंबर           17, 18, 22, 23, 24, 25, 26

डिसेंबर 2 ते 5 डिसेंबर, 9, 10, 11,13, 15 मे