Cannes 2024 : नॅन्सी त्यागीने रचला इतिहास! सेल्फ स्टीच गाऊनमध्ये केले डेब्यू

अलिकडेच स्वत: च्या शिवण कलेमुळे प्रकाशझोतात आलेल्या नॅन्सी त्यागीने कान्स 2024 मध्ये स्वत: शिवलेला गाऊन परिधान करून डेब्यू केले. तिच्या या डेब्यूचा व्हिडीओ आणि फोटोस सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nancy Tyagi (@nancytyagi___)

नॅन्सी त्यागीने कान्स 2024 मध्ये एका सुंदर गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये पदार्पण केले. या गुलाबी रफल्ड गाऊनचे वजन 20 किलो होते. तर हा गाऊन 1000 मीटर कपडा वापरून बनवण्यात आला होता. तिचा ड्रेस पूर्ण करण्यासाठी तिला एक महिन्याचा कालावधी लागला.

नॅन्सीने तिच्या कान्स रेड कार्पेटवरील लूकची काही छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून सर्व स्तरांतून तिची प्रशंसा होत आहे. तसेच ब्रूट इंडियाने अपलोड केलेल्या व्हिडीओ चंकला 24 तासांच्या आत 24 दशलक्षाहून अधिक व्ह्यूस मिळाले आहेत. त्याचबरोबर सोनम कपूर, उर्फी जावेद सारख्या सेलिब्रिटींनी देखील तिचा व्हिडीओ शेअर करत तिचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nancy Tyagi (@nancytyagi___)


कोण आहे नॅन्सी?
उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील एका लहानशा गावातून फ्रेंच रिव्हिएरापर्यंतचा तिचा प्रवास तिने जिद्द आणि मेहनतीने केला आहे. कोविडपूर्वी आपल्या गावातून दिल्लीला स्पर्धा परिक्षा देण्याकरता आली होती. कोविड काळात नॅन्सी आर्थिक अडचणीत सापडली होती. याचवेळी नॅन्सीने सोशल मीडियावर स्वत: शिवलेल्या कपड्यांचे व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने तिने मिशो हॉल दाखवण्यास सुरुवात केली. यावेळी तिला भरपूर प्रतिसाद मिळू लागला, पण हा प्रतिसाद टीकांनी भरलेला होता. तिला तिच्या व्हिडीओसाठी तसेच तिच्या शारिरीक ठेवणीवरून ट्रोल केले गेले.

गेल्या वर्षभरात नॅन्सीने प्रसिद्ध अभिनेत्रींनी परिधान केलेल्या पोशाख रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि या व्हिडीओंमुळे ती पुन्हा प्रकाशझोतात आली. दीपिका पदुकोण, आलिया भट्ट सारख्या सेलिब्रिटींनी परिधान केलेल्या पोशाखांची प्रतिकृती तिने बनविले. स्क्रॅचपासून बनवलेल्या पोशाखांसाठी ती लोकप्रिय झाली. सध्या नॅन्सी त्यागीचे इंस्टाग्रामवर 9,30,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत तर युट्यूब वर एक दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.