इन्सुलिनचा डोस देऊन घेतला 17 जणांचा जीव,अमेरिकेत नर्सला 760 वर्षांची शिक्षा

प्रेसडी मानसिक आजारी पिंवा वेडीही नाही. ती एक दुष्ट व्यक्ती आहे. तिच्याकडे पाहिल्यानंतर सैतानाला पाहिल्यासारखे मला वाटले. पीडिताच्या एका नातेवाईकाने न्यायालयात सांगितले.

अमेरिकेतील एका नर्सला 380 ते 760 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या नर्सने तीन वर्षांत अनेक रुग्णांना जीवे मारण्यासाठी जास्त इन्सुलिन दिले होते. यामुळे 2020 ते 2023 या दरम्यान पाच वेगवेगळ्या आरोग्य पेंद्रात कमीत कमी 17 लोकांचा मृत्यू झाला होता. यात नर्सला दोषी ठरवण्यात आल्यानंतर कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. हीथर प्रेसडी (41) असे या नर्सचे नाव असून ती पेन्सिलवेनिया येथील रहिवासी आहे. तीन हत्या आणि 19 हत्येच्या प्रयत्नात नर्सला दोषी ठरवण्यात आले. प्रेसडी ने 22 रुग्णांना गरजेपेक्षा जास्त इन्सुलिन दिले होते, असा तिच्यावर आरोप आहे. यातील काही रुग्ण हे डायबेटिजचे रुग्ण नव्हते. तरीसुद्धा तिने इन्सुलिन दिले होते. नाईट शिफ्ट असताना ती हे काम करायची. तिने ज्या रुग्णांना इन्सुलिन दिले. त्यात 43 ते 100 वयोगटातील रुग्ण होते.