पुण्यात पुन्हा एक भलेमोठे होर्डिंग कोसळले, घोडा गंभीर जखमी

मुंबई आणि पुणे येथे होर्डिंग कोसळल्याच्या घटना ताज्या असताना शनिवारी पुन्हा एकदा पुण्यात एक मोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत एका बँड पथकातील घोडा गंभीर जखमी झाला आहे.

पुण्यात सध्या अवकाळी पाऊस कोसळत आहे. शनिवारी पुण्यातील सोलापूर रोडवरील गुलमोहर लॉन्स जवळ असलेल्या टोलनाक्या जवळ असलेले एक भले मोठे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळे. हे होर्डिंग एका बँड पथकावर कोसळले. या बँड पथकातील घोडा या होर्डिंगखाली अडकला होता. त्यालाबाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. या घटनेचे माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.